सरकारच्या या निर्णयामुळे रिक्षा चालक टॅक्सी चालक संताप व्यक्त करत आहे
प्रतिनिधी :-रवि अण्णा जाधव
देऊळगाव मही :-राज्य परीवहन महामंडळाच्या सेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी महिला सन्मान योजना जाहीर झाल्यानंतर आता बसमध्ये वास करणाऱ्या महिलांना आता ५० टक्के सवलत आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस यंदाच्या अर्थसंकल्पीय महिलांना एसटी बसमध्ये प्रवास भाड्यात ५०
सवलत देण्याची घोषणा केली . या घोषणेनंतर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. तर झाली त्याची अंमलबजावणी केव्हा होते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. १ एप्रिल २०२३ पासून ही सवलत योजना लागू होईल असा अंदाज वर्तविण्यात येत होता. राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने १ एप्रिल २०२३ ची वाट न पाहता १६ मार्च रोजी सरकारने सन्मान योजना लागू केली.
१७ मार्च २०२३ पासून एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना बसभाड्यात ५० टक्के सवलत देण्याचे आदेश काढले आणि ते आदेश राज्यातील सर्व विभागीय नियंत्रकांना पाठविण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी १७ मार्च २०२३ पासून करण्यात आली. बस प्रवास करणाऱ्या उपरोक्त वयाच्या महिलांना याचा फायदा देण्यात आला. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी तर तिसऱ्या दिवशी अधिक दिसून आली.
काळी पिवळी टॅक्सी चालकांच्या – उत्पन्नात घट चिखली येथून देऊळगाव राजा ,आदी मार्गावर ऑटो रिक्षा , काळी पिवळी टॅक्सी हे प्रवासी वाहतुक करतात. परंतु महिलांना ५० टक्के सवलत मिळाल्याने उपरोक्त वाहनातून प्रवास करण्याकडे महिलांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाबद्दल उपरोक्त वाहन चालक संताप व्यक्त करीत आहेत.*(रिक्षा चालक हुसेन बागवान)