Home बुलडाणा भव्य राज्यस्तरीय खुली शूटिंग बॉल स्पर्धा देऊळगावराजा येथे संपन्न

भव्य राज्यस्तरीय खुली शूटिंग बॉल स्पर्धा देऊळगावराजा येथे संपन्न

137

प्रतिनिधी :-रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा:- येथे बालाजी क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य खुली शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अशोक चाटे, लक्ष्मण खैरे बाबा, उद्धव नागरे, ज्योतिरादित्य रामप्रसाद शेळके यांच्या वाढदिवसा च्या निमित्ताने ॲमेच्यूर शुटीग बाॅल असोशियन महाराष्ट्र राज्य तथा शूटिंग बॉल असोसिएशन बुलढाणा यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय खुल्या शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बालाजी क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय खुल्या शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन लिंबाला स्टेडियम आठवडी बाजार येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. डॉ. रामप्रसाद शेळके (उपाध्यक्ष) ॲमेच्यूर शूटिंग बॉल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. तोतारामजी कायंदे माजी आमदार हे होते. तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये न. प. मुख्याधिकारी अरुण मोकळ, शकील काजी, इनायत खाॅ कोटकर, प्रदीप वाघ, हर्षवर्धन देशमुख, दीपक कासारे या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. या मध्ये अनेक संघांनी सहभाग नोंदवला होता. सोलापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड ,अकोला ,बुलढाणा, टेंभुर्णी, जाफराबाद, जालना, सिल्लोड, जळगाव जामोद ,चिखली अशा एकूण 45 संघांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी पंच कमिटी मध्ये शकील काझी, अशोक साठे, लक्ष्मण खैरे ,रफिक नाना ,फयाज टेलर, जफर सिद्दिकी ,गवई सर, रमेश मांटे, खरात सर, खपके नाना, शिराळे सर तसेच पंच म्हणून यावेळी काम पाहिले आत्माराम गाढे, प्रफुल्ल चव्हाण, नागरे सर, बाशीद पटेल, मनगटे, आप्पासाहेब यावेळी आयोजक म्हणून बालाजी क्रीडा मंडळ च्या सदस्यांनी संपूर्ण सहकार्य केले तसेच मॅचेस पार पाडल्या.