Home नांदेड सेवानिवृत्त वनाधिकारी दासुजी संदुलवार यांचे निधन.

सेवानिवृत्त वनाधिकारी दासुजी संदुलवार यांचे निधन.

150

आज दिनांक 25 मार्च रोजी अंबाडी येथे अंत्यविधी.

किनवट- मौजे अंबाडी ता.किनवट येथील मन्नेरवारलू समाजातील सेवा निवृत्त वनपाल श्री दासु बापूजी संदुलवार वय 65 वर्ष यांचे आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान चक्कर येवून जमिनीवर अचानक कोसळले त्यानंतर त्यांना लगेचच किनवट येथे उपचारासाठी डॉ. बेलखोडे यांच्या हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी निधन झाल्याचे घोषित केले. दासूजी संदुलवार हे वनविकास महामंडळलमध्ये कार्यरत असताना सगळ्या समवेत हसत खेळत जबाबदारी निभावून 2016 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.तरी त्यांची अंत्यविधी मौजे अंबाडी ता. किनवट येथे आज दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे.दासूजी संदुलवार यांचे उपचाराकरिता नेले असताना त्यांची प्राणज्योत मावळली.मृत्युसमयी ते 65 वर्षाचे होते त्यांना लो बिपी चा त्रास होता.दासुजी संदुलवार यांना दोन मुले,दोन मुली नातू,पणतू असा मोठा परिवार आहे ते लिंगी येथील सहशिक्षक श्री दत्तात्रय संदुलवार सर,व्यंकटी संदुलवार यांचे वडील व विनोद शेटपेल्लीवार,दिंगबर नल्लेवाड गुरुजी,डॉ संतोष तोटावार,नितीन मुपडे सर यांचे ते सासरे होय.दासूजी संदुलवार साहेब उभ्या आयुष्यमध्ये कुणालाही एका शब्दानेही कुणालाही दुखावल्याचे दिसत नाही त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरला आहे. ईश्र्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..

*#भावपुर्ण श्रद्धांजली💐🙏🏻*