हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
महागाव:- आदर्श राजा ,मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम जन्मोत्सवाचे औचित्य साधुन महागाव तालुक्यातील हिवरा(संगम) येथे ठिक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्रीराम नवमीनिमित्त हिवरा(संगम) येथील वार्ड क्र.२(मेन रोड) मध्ये अयोध्या मित्रमंडळ तर वार्ड क्र.१(ईजनी रोड)येथे न्यु व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हिवरा व परिसरातील हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.या कार्यक्रमाचे आयोजन अयोध्या मित्र मंडळाचे संतोष जाधव(तेलगावकर), स्वप्नील बेलखेडे,किरण ताकतोडे,लखन कदम,आशीर्वाद कवाने,करण खंदारे,ऋषिकेश कदम,गोलु रोहणकर,कृष्णा कदम,आशिष कदम,पवन कदम,विवेक हिरेकर,वैभव मोझरकर,बालाजी राऊत ,लवटे ,न्यु व्यापारी मित्र मंडळाचे डॉ.नितीन आडे,संजय जयस्वाल,अजय देशमुख,सुनिल बोंपिलवार,ओम खंडेलवाल,सचिन भारती, डॉ.योगेश रहाटे,रामेश्वर राऊत, बाळा खंदारे,पवन पाचकोरे,अनंता शिंदे,प्रविण लेवाळकर,अनिल बोरकर,शुभम वानखेडे,वैभव बिलकुलवार,रोहित पाचकोरे,ओम पाचकोरे , शेख अकबर,स्वप्निल खंदारे ,सोनु शिंदे,यांच्यासह कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेवुन केले.