फुलचंद भगत
वाशिम:-समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून नागरिकांच्या मालमत्तेची चोरी/नुकसान करणाऱ्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाते. नुकतेच वाशिम शहरातील मोटारसायकल व मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या ०२ आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले आहे.
वाशिम शहरातील सिव्हील लाईन परिसरातील रिगल कॉम्पुटरसमोरून एका इसमाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्या हातातील मोबाईल जबरदस्ती हिसकावून घेत पळून जात जबरी चोरी करणाऱ्या दोघांविरुद्ध पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.१९६/२३, क.३९२, ३४ भा.द.वि. नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. तसेच वाशिम शहरातील मनिप्रभा हॉटेलजवळील राठी हॉस्पिटलसमोरून एक मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली होती. त्यासंदर्भात पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.२१०/२३, क.३७९, ३४ भा.द.वि. नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर प्रकरणांचा तपास करत असतांना वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील आरोपींचा सदर गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव शहरातील ०२ आरोपींना सदर प्रकरणी ताब्यात घेतले व त्यांच्याकडून जबरीने हिसकावून नेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व चोरीस गेलेली मोटारसायकल असा एकूण १.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, सपोनि.अतुल मोहनकर, पोहवा.सुनील पवार, पोना.राजेश राठोड, प्रशांत राजगुरू, पो.शि.निलेश इंगळे, डीगांबर मोरे, अविनाश वाढे, विठ्ठल सुर्वे सर्व नेमणूक स्था.गु.शा., वाशिम, पो.शि. गोपाल चौधरी, प्रशांत चौधरी नेमणूक – सायबर पोलीस स्टेशन, वाशिम यांनी पार पाडली.