बिलोली प्रतिनिधी
महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे खातेदार असलेले मलगोंडा गोपरे यांचे आचानक निधन झाले. त्यांनी महाराष्ट्र बँकेकडून बँक मिञ वैभव घाटे यांच्या कडे 330 रु चा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून दोन लाखांचा विमा काढला होता. आता त्यांच्या पश्चात या विम्याचा धनादेश त्यांच्या वारस पत्नी गंगुबाई गोपरे यांना बँकेचे शाखाधिकारी श्री केरुरे सर व शुभम सर भुषण सर वैभव घाटे सुहास देवकरे सोनबा पाटील यांच्या समक्ष दोन लाखांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी शाखाधिकारी केरुरे सर पुढे बोलताना म्हणाले,आज जी गोपरे कुटुंबावर वेळ आली आहे, ती कोणावरही येऊ नये. सध्या धावपळीच्या जीवनात कोणाचेही काहीही सांगता येत नाही. हे कोरोनाने सर्वांना शिकवले आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं कसं होणार याची चिंता भेडसावत असते. त्यामुळे बँकेचे सर्व खातेदार, शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून विमा काढला तर आपल्यानंतरही आपल्या कुटुंबास आपण मदत करू शकतो आसे म्हणाले
त्यादरम्यान शाखाधिकारी केरुरे सर सह्याक शाखाधिकारी शुभम हुमने सर रोखपाल भुषण ताडोड सर बँक मिञ वैभव घाटे सुहास देवकरे सोनबा शेनपुंजे इत्यादीची उपस्थिती होती..