Home बुलडाणा अंढेरा येथील पत्रकार व हॉटेल व्यवसायिक खंडू मान्टे यांच्या घरावर चोरट्यांकडून दरोड्याचा...

अंढेरा येथील पत्रकार व हॉटेल व्यवसायिक खंडू मान्टे यांच्या घरावर चोरट्यांकडून दरोड्याचा प्रयत्न.मावशीच्या ओरडण्याने दरोड्याचा प्रयत्न फसला.

78

प्रतिनिधी :-रवि आण्णा जाधव

देऊळगाव मही:-स्थानिक अंढेरा येथिल दैनिक देशोन्नतीचे पत्रकार तथा हॉटेल व्यवसायिक खंडू मान्टे व शिवानंद मान्टे यांच्या अंढेरा फाटा येथील घरावर दि.२८ एप्रीलच्या रात्री दीडच्या सुमारास सर्व कुटुंब आपल्या परिवारसह सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे घराच्या गच्चीवर व व्हरांड्यात झोपलेले असताना दरवाजा बंद करुन मावशी सौ.कुशिवर्ता कारभारी कायंदे ह्या लहान मुलीनां जवळ घेऊन गाढ झोपेत असताना चोरट्यांनी लोखंडी कपाट मध्य चोरी करत असतानां मावशीच्या लक्षात आले पण चोरांनी लगेच सावध होत मावशीच्या अंगावरील सोन्याची पोत ओढत असताना मावशीने आरडाओरडा करुन घराचा दरवाजा उघडला तो पर्यंत मागिल दरवाजा उघडून अंधाराचा फायदा घेत पाच ते सहा दरोडेखोरांनी सेवानगरकडे पलायन केले मात्र लगेच शिवा मान्टे व शेजारील जगन डोईफोडे,अमोल कापसे,सुभाष डोईफोडे इतर पाच ते सहा जणांनी हातात येईल ते घेत काड्या घेउन अंधारातच चोरांचा पाठलाग केला.परंतु राञीला अंधाराचा फायदा घेत चोर पसार झाले घटनेची माहिती होताच रात्री गस्त घालणारे पेट्रोलिंग करणारे पो काॕ.विनोद वाघमारे ,पो.काॕ.अरुण खार्डे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. व सेवा नगर,अंधेरा फाटा,पिंपरी आंधळे या मार्गाने चोरांची पाहणी केली असता दरोडेखोर तोपर्यंत पसार होण्यात यशस्वी झाले.रात्री दीड वाजे दरम्यान अंढेरा पोलिस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले.या घटनेत कोणत्या प्रकारची मारहाण झाली नसून शेजारी पाजारी जागी असल्याने दरोडेखोरांचा फार मोठा दरोडा टाकण्याचा प्रयत्न मावशीच्या प्रसंगावधानामुळे फसला.शेजारच्या दहा,बारा जणांनी पुर्ण राञ जाऊन काढली.तसेच पाळलेल्या कुञ्याच्या भुकंण्याच्या आवाजाने बाहेरील शेजारी जागी झाल्याने मोठा अनर्थ टळला.अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी सकाळीच घटनास्थळाला भेट दिली.व पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या.


आठवडाभरातील दुसरा घटना, पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह?
अंढेरा फाट्यावर आठ दिवसापूर्वी पिंपरी आंधळे रस्त्यावरील शंकर सानप सुभाष सानप यांच्या घरावर चोरांनी दरोडा टाकून सोने,चांदी घेउन दरोडेखोर फरार झाले ही घटना ताजी असतानाच आज रात्री अंढेरा मार्गावरील सेवा नगर फाट्या वर घर मालकाच्या व पाहुणे आलेल्या मावशीच्या आरडा ओरडीने शेजाऱ्यांच्या व नातेवाईक मुळे दरोड्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न फसला.यामुळे अंढेरा पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असुन दरोडे खओरआंनआ पकडण्याचे मोठे आवाहन अंढेरा पोलिसांपुढे उभे ठाकले आहे
एवढे मात्र खरे!