Home अकोला स्वर काव्य महोत्सवाच्या देणगी प्रवेशिकेचे लोकार्पण सोहळा संपन्न दिव्यांग सोशल फाउंडेशन चा...

स्वर काव्य महोत्सवाच्या देणगी प्रवेशिकेचे लोकार्पण सोहळा संपन्न दिव्यांग सोशल फाउंडेशन चा दिव्यांग शिक्षणासाठी विशेष उपक्रम

88

प्रतिनिधी. प्रा.मो.शोएबुद्दीन

अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे *रविवार दि. २८ मे २०२३ रोजी आर.एल.टी विज्ञान महाविद्यालय अकोला येथे सायंकाळी ५ वाजता स्वर काव्य महोत्सवाचे आयोजन केले आहे . दिव्यांगांच्या शिक्षण , रोजगार व आरोग्यासाठी समर्पित या कार्यक्रमात संगीतकार कौशल इनामदार व स्टार प्रवाह फेम अभिनेत्री इरावती लागू यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या या कार्यक्रमात दिव्यांगांना व्हिल चेअर , व्हाईट केन , ब्रेल बुक्स व शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाणार आहे . संपूर्ण भारतातून या कार्यक्रमासाठी दिव्यांग कवी उपस्थित राहून आपली काव्य प्रस्तुती करणार आहेत . *या कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिकेचा लोकार्पण सोहळा दि.२८ एप्रिल २०२३ रोजी जागृती विद्यालय अकोला येथे पार पडला . जागृती शिक्षण प्रसारक संस्था अकोला चे सचिव ॲड.विलास भाऊ वखरे , मुख्याध्यापक श्री.अरुण राऊत व प्रा.विशाल कोरडे यांच्या हस्ते स्वर काव्य महोत्सव एक हात सहकार्याचा या संगीतमय कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिकेचे लोकार्पण करण्यात आले* . *प्रा.विशाल कोरडे यांच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात जागृती विद्यालय नेहमीच सोबत असल्याचे आश्वासन ॲड.विलासभाऊ वखरे यांनी दिले तर मुख्याध्यापक अरुण राऊत यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमात सर्व अकोलेकरांनी साथ द्यावी जास्तीत जास्त देणगी प्रवेशिका घेऊन दिव्यांगांना सहकार्य करावे असे आव्हान केले* . आपल्या आभार प्रदर्शनात प्रा.विशाल कोरडे यांनी अकोल्यात प्रथमच होऊ घातलेल्या आगळ्यावेगळ्या स्वर-काव्य व सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले . *या कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका मिळवण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या हेल्पलाइन क्रमांक ९४२३६५००९० वर संपर्क साधावा अशी माहिती त्यांनी दिली* . सदर लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला शिक्षक वृंद , परिसरातील नागरिक व लुईस ब्रेल वाचक लेखनिक बँक अकोलाचे सर्व सदस्य उपस्थित होते .