Home पालघर जव्हार येथे हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा शुभारंभ

जव्हार येथे हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा शुभारंभ

85

जव्हार :- सोमनाथ टोकरे

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज दिनांक १ मे २०२३ रोजी राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून तब्बल ३१७ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत ऑनलाईन प्रणाली द्वारे करण्यात आला. ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याचा विचार करून प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. आता वाढत्या शहरीकरणाचा व विस्तारित शहरांचा विचार करता गोरगरीब रुग्णांना सामान्य आजारासाठी तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून आरोग्य मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना मांडली होती. तात्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने पहिल्या टप्प्यात २०० दवाखान्यांना मान्यता दिली होती परंतु कोरोना काळामुळे यातील थोडेच दवाखाने त्यावेळी सुरू झाले. आता मात्र एकनाथ शिंदे यांनी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेला युद्ध पातळीवर गती देण्याचा निर्णय घेतला व आज या योजनेचे ऑनलाईन प्रणाली द्वारे उद्घाटन केले. उद्घाटन झाल्यानंतर त्याचाच ऐक भाग म्हणून जव्हार शहरातील मागेलवाडा या ठिकाणी या दवाखान्याचा शुभारंभ करण्यात आला.या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी फटागरे ,पंचायत समिती सभापती सौ. विजया लाहारे, साहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी आयुषी सिंह , तहसीलदार आशा तमखाडे, मुख्याधिकारी मानिनी कांबळे , रोहिदास चर्मकार आयोगाचे सदस्य विनित मुकणे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते या वेळी बोलतांना पंचायत समिती सभापती सौ विजया लाहारे यांनी सांगितले की शहरी भागातील गोरं गरीब रुग्णांना या योजनेचा लाभ होनार आहे . त्यामुळे ही योजना खुपचं चांगली आहे.या वेळी सर्वच उपस्थित मान्यवरांना आरोग्य विभागाकडून वृक्षरोप भेट म्हणून देण्यात आले.