Home यवतमाळ Yavatmal – जिल्ह्यातील शेतकर्यांची विष प्राशन करून आत्महत्या

Yavatmal – जिल्ह्यातील शेतकर्यांची विष प्राशन करून आत्महत्या

73

यवतमाळ तालुक्यातील पिंपरी पांढुरणा येथील युवा शेतकरी बबलू नारायण राठोड याने सततची नापिकी कर्जबाजारी पणामुळे सकाळी शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली आहे . सदर शेतकर्यावर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 85 हजार रूपये व काही ईतर खाजगी कर्ज होते त्याचेकडे साडे चार एकर शेती असून दोन वर्षांपूर्वी आजारपणामुळे आई आणि वडील दोघांचा मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण परिवाराची जवाबदारी याचे वर आली त्याच्या मागे पत्नी , 10 वर्षाची मुलगी , एक मुलगा व दोन लहान भाऊ आहे त्याच्या आत्महत्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

यावर्षी अतिवृष्टीमुळे  शेतीचे खरीप पिक हातचे गेले त्यात भाव नाही रब्बी मध्ये तसेच झाले जस जसे आकाशात ढग दाटून पाऊस येत होता तसेच त्याच्या मनात पेरणी कशी करावी हा विचार होता , दि. 3 मे पाऊस झाला म्हणून तो झाडा खाली बसून विचार करीत बसला सर्व रस्ते बंद झाले पेरणीसाठी फक्त एक महिना बाकी आहे या चिंतेत तो 3 ते 4 दिवसापासून चिंतित होता पण शेवटी कीटकनाशके प्राशन करून त्याने स्वतःची जीवनयात्रा संपवली  या शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे युवा शेतकरी आत्महत्या करीत असल्याची ओरड जनसामान्यांच्या मनात  पसरली आहे.