Home विदर्भ दर्जेदार शिक्षण मिळावे,यासाठी विद्यापीठाचा सतत प्रयत्नात मा. कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील कुलगुरु

दर्जेदार शिक्षण मिळावे,यासाठी विद्यापीठाचा सतत प्रयत्नात मा. कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील कुलगुरु

84

अमरावती – दि. 06  मे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ शिक्षणापासून वंचित घटकांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच दर्जेदार शिक्षण मिळावे,यासाठी विद्यापीठ सतत प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मा. कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरु यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांनी केले. “ज्ञानगंगा घरोघरी” हे विद्यापीठाचे ब्रीदवाक्याप्रमाणे शिक्षणाची गंगा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा उद्देश विद्यापीठाचा आहे. विद्यापीठ, अभ्यास केंद्र, आणि विद्यार्थांपर्यंत पोहोचवण्याचा महत्वाचा दुवा म्हणजे विभागीय केंद्र. विभागीय केंद्रांमध्ये आधुनिक व्यवस्था व सुविधा उपलब्ध व्हावात व त्यामुळे विद्यार्थी व अभ्यास केंद्रांच्या अडचणी सोडविणे अधिक सुलभ होईल व त्यांना मार्गदर्शन करणे अधिक सोयीचे होईल, यासाठी विभागीय केंद्राचे नुतनीकरण करणे आवश्यक होते.आज जुन्या इमारतीचा कायापालट करून ती एक हरित, सुसज्ज व सोयीयुक्त इमारत करण्यात आली आहे.असे प्रतिपादन ‘हरित’ इमारत नुतनीकरण उद्घाटनाच्या निमित्त आयोजीत कार्यक्रमात मा. कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले


दि. 05/05/2023 रोजी अमरावती विभागीय केंद्राच्या नुतनीकरण हरित इमारतीतील विभागीय संचालक यांचे दालन, कॉन्फरन्स हॉल, इमारतीचे सौर ऊर्जा करण, केंद्राच्या परिसरात ठिबंक सिंचन योजना, सी.सी.टी.व्ही. व्दारे संपूर्ण परिसराची देखरेख व्यवस्थेचे उद्घाटन मा. कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते कोनशीलाचे अनावरण करून करण्यात आले
या प्रसंगी डॉ. संजय खडक्कार, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, अमरावती विभाग, यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये विभागीय केंद्राची जून्या इमारतीचे सुशोभीकरण व नुतनीकरण केल्याबद्दल मा.कुलगुरू कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे आभार मानले. मा. कुलसचिव(प्र) श्री. भटूप्रसाद पाटील व मा. वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे यांनी पण यथोचित मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता श्री. मिलींद ठोके, तसेच विविध अभ्यासकेंद्राचे प्राचार्य, केंद्रसयोजक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अभ्यासकेंद्राच्या वतीने डॉ. ठाकरे सर व श्री. विवेक जाधव, शिवाजी आर्ट अँड कॉमर्स कॉलेज, अमरावती, डॉ. निचत सर ,घेरवरा महाविद्यालय, दारव्हा, डॉ. भगत सर, डॉ. प्रेमसिंग राठोड सर, अतुल वानखडे सर, हांडे सर, गावंडे महाविद्यालय उमरखेडचे प्रा.लाभशेटवार सर, प्रा.नंदनवार सर ,डॉ. टिपरे सर, प्रा. पारवे सर यांनी मान्यवराचे अभ्यासकेंद्राच्या वतीने स्वागत केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. मनिष गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. विवेक गुल्हाणे यांनी केले. याप्रसंगी श्री. प्रकाश मानकर, श्री.मयुरेश साळुंके, सौ. सुनिता कानडे, श्री. विवेक जाधव, श्री. सागर उज्जैनकर, श्री. रुपेश टिंगणे, श्री. यश गुडधे, श्री. तेजस मडघे, श्री. प्रविण धर्माळे, श्री. सागर कडु, श्री. राहुल गायकवाड, श्रीमती सुनिता इंगळे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.