अयनुद्दीअन सोलंकी,
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी, 12 मे : घाटंजी पंचायत समितीच्या वादग्रस्त गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी 12 मे रोजी कार्यमुक्त केले आहे. दरम्यान, माडकर यांच्या जागेवर घाटंजी पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी महेश देवराव ढोले यांना घाटंजी पंचायत समितीचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे.
घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांचे विरुद्ध जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आदींनी गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांच्या विरुद्ध शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या. मात्र, सदर तक्रारी राजकीय दबावाखाली दाबुन टाकण्यात आल्या. नंतर कोणताही चौकशी करण्यात आली नाही. विशेष म्हणजे घाटंजीच्या वादग्रस्त गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांची बदली कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा पंचायत समिती येथे झाली होती. राज्याचे अवर सचिव डॉ वसंत माने यांनी 16 मार्च रोजी सोनाली माडकर हिची बदली केली होती. मात्र, माडकर ह्या घाटंजी पंचायत समिती सोडण्यास अजिबात उत्सुक नव्हत्या. यातच दैनिक पुण्यनगरीने घाटंजी पंचायत समितीच्या सभापती गट विकास अधिकारी सोनाली माडकर ह्या घाटंजी पंचायत समिती न सोडण्याचे कारण गुलदस्त्यात असल्याची, बातमी प्रकाशित करुन खळबळ निर्माण केली होती. अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीधर पांचाळ यांनी त्यांना कार्यमुक्तीचे आदेश 12 मे रोजी दिले आहे. त्यामुळे प्रभारी गट विकास अधिकारी म्हणून महेश ढोले हे रुजू झाले आहे.