जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर
२०१४ साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा हा पूर्णपणे स्वतंत्र करण्यात आला पालघर जिल्हा हा पूर्णपणे डोंगराळ भागात असून येथील नागरिक हे ९५ % आदिवासी वस्ती आढळून येते.त्यातच या मध्ये किरकोळ काही नागरिक हे आता आदिवासी असून त्यांनी ख्रिचन धर्म स्वीकारत असल्याचे जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम असलेली ग्रूप ग्रामपंचायत वावर वांगणी येथे आढळुन आले आहेत तर आज दिनांक १० मे २०२३ रोजी येथील ग्रामसभा मध्ये सगळ्यांचे मते जे वावर वांगणी ग्रामपंचायत मधील नागरिक ख्रिचन धर्म स्वीकारतील त्यांना या पुढे कोणतेही आदिवासी योजनाचा लाभ घेता येणार नाही .
परंतु त्यांच्याकडे आतापर्यंत सगळे कागदपत्रे हे आदिवासीच्या नावाने असून वावर वांगणी ग्रूप ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच विनोद बुधर आणि सदस्य यशवंत बुधर साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले की यापुढे जातीचा दाखला असेल किंवा इतर सगळे कागदपत्रे हे ख्रिचन धर्म मध्ये करून घ्यावे आणि यापुढे तुम्हाला आदिवासी नावाने कोणत्याही योजनाचा लाभ घेता येणार नाही आणि त्यांचेकडे आदिवासीच्या नावाने काही पदे असतील तर ते तात्काळ रद्द करावी अशी मागणी केली तसेच काही नागरिकांचे असे म्हणणे आहे की आपला आदिवासी नागरिक हा खूप कमी होत चालला आहे त्यांचे मुख्य कारण म्हणजे ख्रिचन धर्म मध्ये जास्त नागरिक जाताना दिसत आहेत म्हणून तर आपले आदिवासी नागरिक खूप मागे राहिले आहेत तर आपला आदिवासी नागरिक हा एकत्र कशा येईल त्यासाठी वावर वांगणी ग्रामपंचायत मध्ये अशा हा निर्णय घेण्यात आला आहे.
या वेळी वावर वांगणी ग्रूप ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच विनोद बुधर उपसरपंच रमेश बीज,ग्रामसेवक तसेच सर्व सदस्य आणि आशा वर्कर ,अंगणवाडी सेविका,रोजगार सेवक, व इतर गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते.