Home नांदेड मुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे यांना ज्येष्ठ पत्रकारांचे खुले निवेदन…

मुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे यांना ज्येष्ठ पत्रकारांचे खुले निवेदन…

99
महोदय, महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ पत्रकारासाठी 2019 ला सुरू केलेल्या कैलासवासी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही. चार वर्षात माझ्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी अनेक वेळा निवेदने दिली, त्या केल्या परंतु परंतु कोणताही विचार झाला नाही. याबाबत मी माझा स्वतःचा अनुभव आपणास विनम्रपणे कळवीत आहे.कैलासवासी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या पेन्शन साठी 2019 ला ला प्रस्ताव दाखल केला त्यानंतर नऊ महिन्याने मी मंत्रालयात तत्कालीन संचालक सुरेश वांदिले यांना भेटलो.सुरेश वांदिले हे एक चांगले अधिकारी आहेत अशी आमची भावना आहे कारण त्यांनी नांदेडमध्ये जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय येथे विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून पत्रकारांसोबत चांगले संबंध ठेवले होते.
जुने अधिकारी ओळखीचे असल्यामुळे मी त्यांना मंत्रालयात त्यांच्या कक्षात अर्धा तास चर्चा करून माझा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली.
माझ्या पस्तीस वर्षाच्या पत्रकारितेतील सर्व लिखाण नावासहित बातम्या त्या संचिकेत होत्या.
सुरेश वांदिले म्हणाले, तुम्ही पत्रकार आहात असे मला वाटत नाही.
त्यांचे स्पष्टीकरण ऐकून मला धक्का बसला.
मी त्यांना दुसरा प्रश्न केला की साहेब, सरकार कोणाचेही असो मी 35 वर्ष विकासात्मक पत्रकारितेवर उत्कृष्ट लिखाण केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने मला जिल्हास्तरापासून राज्यस्तरापर्यंत जे पाच पुरस्कार देऊन सन्मानित केले ते काय म्हणून?
माझ्या या प्रश्नावर सुरेश वांदिले गप्प झाले. काय उत्तर द्यावे हे त्यांना समजेना.विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये माझ्यासारखी उत्कृष्ट पत्रकारिता केलेला पत्रकार आज शोधून सापडणार नाही.
स्वतःची स्तुती म्हणून सांगत नाही तर वास्तव सांगत आहे.
सुरेश वांदिले हे फार विद्वान आणि अभ्यासू अधिकारी आहेत. हे दररोज मोठमोठे लेख प्रकाशित करतात त्याचा आम्हाला अभिमान आहे परंतु माझ्यासारख्या अस्सल पत्रकाराला त्याच्या हक्कापासून जाणीवपूर्वक डावलले जाणे याचा संताप आहे.
माझे वय 74 वर्ष असून 1980 ते 2020 या 40 वर्षाचे पत्रकारितेचे रेकॉर्ड मी वेळोवेळी सादर केले परंतु राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी माझ्या प्रस्तावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत असे मला वाटते कारण मराठवाड्यातला अशा प्रकारचा मी एकमेव पत्रकार आहे.प्रत्येक वेळी ज्या त्रुटी काढल्या त्या दुरुस्त करून मी शेवटचे प्रस्ताव सादर करून नऊ महिने झाले तरीसुद्धा माझ्या प्रस्तावावर मंजुरी मिळाली नाही.
सत्तरी ओलांडलेले आणि पत्रकारी ते शिवाय दुसरे काहीही न केलेले अनेक ज्येष्ठ पत्रकार आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत त्यांना कोणताही आधार नाही .केवळ मरण येत नाही म्हणून दारोदार भिक्षा मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
मुख्यमंत्री महोदय आपण गेल्याच गेल्या आठवड्यात पत्रकारांसाठी मोठी घोषणा केली हे बातमी ऐकून आम्हाला आनंद झाला परंतु आता शासन आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील माझ्यासह अन्य दोन पत्रकारांना आपण पेन्शनचा लाभ मंजूर कराल अशी आम्ही विनंती करीत आहोत.
आपला विश्वासू माधव अटकोरे.9766414367