Home जालना प्रमोद झिनेच्या खून प्रकरणाला कलाटणी…फिर्यादी पत्नीच निघाली खूनी…!

प्रमोद झिनेच्या खून प्रकरणाला कलाटणी…फिर्यादी पत्नीच निघाली खूनी…!

91

अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे उघडकिस
स्थानिक गुन्हे शाखेने केला खूनाचा उलगडा

जालना/लक्ष्मण बिलोरे

7 मे रोजीच्या जालना शहरातील टीव्ही सेंटर भागातील प्रमोद झिने,वय ४० यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता.
याप्रकरणात मयताची पत्नी आशा झिने यांच्या फिर्यादीवरून एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता व तिला अटकही करण्यात आली होती.
त्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते त्यातूनच त्या महिलेने खून केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
दरम्यान, प्रमोद झिने यांच्या खून प्रकरणातील खऱ्या आरोपीच्या पर्दाफाश करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी या गुन्ह्यातील खऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मयत प्रमोद झिने यांची पत्नी आशा हिचे रेवगाव येथील रुपेश योहानराव शिंदे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते.
अनैतिक संबंधात अशा झिने आणि रुपेश शिंदे यांनी एक महिन्यापूर्वीच प्रमोद याच्या खुनाचा कट केला होता.
६ मे २०२३ च्या रात्री प्रमोद हे मद्यप्राशन करून झोपलेले असताना आशा झिने हिने संधी साधून प्रियकर रुपेश शिंदे यास बोलावून घेऊन प्रमोद यांचा झोपेतच कुऱ्हाडीने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले.
स्थानिक गुन्हे शाखेने मयताची पत्नी आशा झिनेआणि तिचा प्रियकर रुपेश शिंदे या दोघांना ताब्यात घेऊन तालुका जालना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्यासह पथकाने या खुनातील खऱ्या आरोपीचा छडा लावला आहे.