Home यवतमाळ घाटंजी तालुक्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांच्या तालुक्यात तथा यवतमाळ जिल्ह्यात बदल्या..!

घाटंजी तालुक्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांच्या तालुक्यात तथा यवतमाळ जिल्ह्यात बदल्या..!

82

➡️ कुर्लीचे प्रभारी मुख्याध्यापक किसन किणाके यांची मांडवा येथे बदली.!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————–
घाटंजी – राज्याच्या ग्राम विकास विभागाने घाटंजी तालुक्यातील तसेच यवतमाळ जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या तालुक्यात व यवतमाळ जिल्ह्यात झाल्या असून कुर्लीचे प्रभारी मुख्याध्यापक किसन धनुजी किणाके यांची बदली घाटंजी पंचायत समिती अंतर्गत मांडवा येथे झाली आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या, गांव व पंचायत समितीचे ठिकाण असे,
ऊमा पंधरे – कुर्ली वरुन बेलोरा, नितीन मुद्देलवार – कुर्ली वरुन मोवाडा, नितीन दिकोंडवार – सोनखास वरुन शरद, सुजाता इंगोले – मारेगांव वरुन वरजई दारव्हा, श्रद्धा ढवळे – पार्डी नस्करी वरुन बोरगांव आर्णी, ज्ञानदीप शिंदे – रहाटी वरुन कारेगांव आर्णी, राजकुमार भोयर – आंबेझरी वरुन वाटखेड यवतमाळ, बेबी कांबळे – पंगडी वरुन दहेगांव, अशोक राठोड – पार्डी तांडा वरुन पार्डी नस्करी, चंदा मुन – यरंडगांव वरुन किन्ही नंदपूर पांढरकवडा, अर्चना पवने – चांदापूर वरुन बोरगांव पुंजी आर्णी, विठ्ठल पारखे – बोदडी वरुन पंगडी, प्रभाकर बारहाते – मांडवा वरुन पिंपरी, तारा मसराम – शिवणी वरुन पांढुर्णा खुर्द, शरद टेंभेकर – कोपरी खुर्द वरुन वांढळी कळंब, विनायक बोकडे – झरी जामणी पंचायत समिती वरुन कुर्ली, सुरेश बोंडाडे – चिखलवर्धा वरुन गोंधळी बाभुळगांव, मनिष सरगर – पिंपरी वरुन अलेगांव बाभुळगांव, प्रल्हाद पोयाम – घोटी वरुन डेहणी बाभुळगांव, वासुदेव मेंगेवार – सावंगी संगम वरुन खर्डा बाभुळगांव, ममता बिन्नोड – शिवणी वरुन बाभुळगांव, सत्यपाल सोवाळे – शिवणी वरुन बोरजई यवतमाळ, निलु गौरखेडे – पार्डी नस्करी वरुन गांधीनगर कळंब, धनंजय पत्रे – घोटी वरुन वाटखेड यवतमाळ, सुभाष चव्हाण – जरुर वरुन भिसनी यवतमाळ, समीर दाखोळे – देवधरी वरुन हातोला यवतमाळ, वंदना वघारे – तिवसाळा वरुन बेलोरा, अनिल निमजे – किन्ही किन्हाळा वरुन मुर्ली आदीं शिक्षकांच्या बदल्या ग्राम विकास विभागाने केल्या आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीधर पांचाळ यांनी 2 मे पर्यंत कार्यमुक्तीचे आदेश दिले असुन 15 मे पर्यंत रुजु होण्याचे आदेश दिल्याचे विश्वासनिय माहीती प्राप्त झाली आहे.