अयनुद्दीन सोलंकी
———————————
घाटंजी: घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी भैय्या उर्फ नितीन अशोक कोठारी यांची निवड करण्यात आली. तर उप सभापती पदी सचिन सुभाषचंद्र देशमुख पारवेकर यांची निवड करण्यात आली. सदरची निवड ही हात उंचावून करण्यात आली.
माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर यांच्या गटातर्फे संचालक भैय्या उर्फ नितीन अशोक कोठारी यांनी सभापती साठी अर्ज दाखल केला. तर उप सभापती पदी सचिन सुभाषचंद्र देशमुख पारवेकर यांनी अर्ज दाखल केला होता.
तर माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, सुरेशबाबु लोणकर गटातर्फे माजी सभापती अभिषेक शंकरराव ठाकरे यांनी सभापती करिता, तर गुणवंत लेणगुरे यांनी उप सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सचिन कुडमेथे यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली. सदर सभेत हात वर करून मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत भैय्या उर्फ नितीन अशोक कोठारी यांना 10 मतें, तर उप सभापती सचिन सुभाषचंद्र देशमुख पारवेकर यांना सुद्धा 10 मतें मिळाली. तसेच अभिषेक शंकरराव ठाकरे यांना 8 मतें, तर गुणवंत लेणगुरे यांना 8 मतें मिळाली. या मुळे सभापती पदी भैय्या उर्फ नितीन अशोक कोठारी यांची निवड करण्यात आली. तर उप सभापती पदी सचिन सुभाषचंद्र देशमुख पारवेकर यांची निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घाटंजी येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सचिन कुडमेथे यांनी काम पाहिले. त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार यांनी सहकार्य केले.