फुलचंद भगत
वाशिम:-प्राण्यांवरील अत्याचार संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या अधिनियमांन्वये वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये क्रूरपणे होणाऱ्या जनावरांच्या वाहतूक व बेकायदेशीर कत्तली, बेकायदेशीर गोवंश मांस बाळगणे किंवा प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याबाबत आरोपींवर वाशिम पोलीस दलातर्फे वेळोवेळी कारवाई केली जाते.
मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांच्या आदेशान्वये वाशिम जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देऊन जास्तीत जास्त कारवाया करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर दि.१५.०५.२०२३ रोजी पो.स्टे.कारंजा ग्रामीण हद्दीत सफौ.धनराज पवार हे स्टाफसह समृद्धी महामार्गाने पेट्रोलिंग करत असतांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आखातवाडा गावाजवळ नागपूरवरून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो पिकअप गाडी क्र.MH 40 CM 2664 ला अडवून सदर वाहनाची तपासणी केली. त्या वाहनात निर्दयतेने कोंबून भरलेल्या अवस्थेत १० बैल, गाय व गोरे बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सदर वाहनचालक सुकेष्णू मनोहर सावसाकडे यास ११.५० लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. तसेच दि.१९.०५.२०२३ रोजी पो.स्टे.कारंजा ग्रामीण हद्दीत सफौ.धनराज पवार हे स्टाफसह समृद्धी महामार्गाने पेट्रोलिंग करत असतांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आखातवाडा गावाजवळ नागपूरवरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर गाडी क्र.MH 40 BG 9741 ला अडवून सदर वाहनाची तपासणी केली. त्या वाहनात निर्दयतेने कोंबून भरलेल्या अवस्थेत १६ जनावरे निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सदर वाहनचालक शेख मुजाहिद शेख तालिब व शेख रियाज शेख अल्ताफ यांना १३ लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. सदर आरोपींवर पो.स्टे.कारंजा ग्रामीण येथे कलम ११(१)(ड) प्राण्यांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० सहकलम ५ (ब) महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम सहकलम १३०/१७७, ८३/१७७, १५८/१७७ मोटार वाहन कायदा प्रमाणे कार्यवाही करण्यात आली असून एकूण ०२ कारवायांमध्ये ०३ आरोपींसह २४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह(IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.गजानन धंदर, ठाणेदार कारंजा ग्रामीण यांचे पथक सफौ.धनराज पवार, पोकॉ.उमेश चव्हाण, चापोकॉ.धवने यांनी पार पाडली. नागरिकांनी अश्याप्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्ष वाशिम किंवा DIAL 112 किंवा संबंधित प्रभारी पोलीस अधिकारी यांना माहिती द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.