Home बुलडाणा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गुटखा व दारू पकडली ३२२८८० रुपयांनांदुराचा मुद्देमाल जप्त...

पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गुटखा व दारू पकडली ३२२८८० रुपयांनांदुराचा मुद्देमाल जप्त ,

66

 

आरोपीस अटक ,

उमा बोचरे

प्रतिनिधी,नांदुरा

दिनांक १८ मे रोजी गोपनिय बातमीदाराकडून खात्रीलायक मिळालेल्या खबरी वरून सुनील बळीराम नेमाडे वय ३३ वर्ष.रा. पातोंडा यावर पंचासमक्ष धाड टाकली असता त्याच्या ताब्यात
पाच निळ्या रंगाच्या पोतड्या मध्ये विमल पान मसाला कैंसर मुक्त हिरव्या रंगाचे २६० पुढे प्रत्येक पुडा किंमती १८७ एकूण ४८६२०/- रुपये, पाच पांढऱ्या रंगाच्या पोतडया मध्ये दि.१ तंबाखु असे लिहलेले हिरव्या रंगाचे २६० पुढे प्रत्येकी पुढा किंमत ३३/- रुपये प्रमाणे ८५८०/- रुपये, दोन पांढऱ्या रंगाचे पोतडीमध्ये विमल पान मसाला कैंसर युक्त केसरी रंगाचे ४४ पाकीटे एक पाकीट किमत १९८/- रुपये प्रमाणे एकूण ८७१२/- रुपये, दोन प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये वि-1 तबाखु केसरी रंगाचे ४४ पाकीटे प्रत्येक पाकीट किमती २२/- रुपये एकूण ९६८/- रुपये, ७ खोके देशी दारू मंत्रा कंपनिचे प्रत्येक खोक्यात ९० एम एल च्या १०० प्लास्टीकच्या कंपनी शिलबंद एकूण ७०० शिशा प्रत्येकी किंमती ३५ रुपये प्रमाणे ७०० शिशा २४५००/- रुपये, ९ देशी दारू टैगो पंच कंपनीचे प्रत्येक खोक्यात ३० एम. एल च्या १०० प्लास्टीकच्या कंपनि शिलबंद एकुण ९०० शीशा प्रत्येक नग किमती ३५ रुपये प्रमाने ३१५००/- रुपये, मारुती सुझुकी वॉगन आर कंपनिगाची गाडी क्रमांक एम एच-२७एच-७६९६ किमत अंदाजे २००००० रुपये असा एकूण ३२२८८०/- रुपयांचा मुद्देमाल या धाडीत जप्त करण्यात आला.
वरील प्रमाणे देशी दारू व शासनाने प्रतीबंधीत कलेला आरोग्यास हानीकारक असलेला गुटखा असा वरील प्रमाणे माल मिळुन आला. अशा पोलीस नाईक श्री गणेश पुरुषोत्तम पाटील यांच्या तोडी तक्रारीवरून व सापडून आलेल्या मुद्देमालावरून पोलीस स्टेशन नांदुरा येथे रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी सुनील बळीराम नेमाडे यांच्यावर अपराध क्रमांक ३०१/२०२३ कलम १८८,२७३,३२८, भादवी सहकलम अन्न सुरक्षा मानके कायदा कलम २६ (२)(IV) शिक्षापात्र कलम ५९(१) सहकलम ६५(ई) मदाका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.