शिवशाही फाउंडेशन व कृष्णाकाठ प्रतिष्ठान कराड तर्फे वाकान रोड कराड येथे व मुंडे गावात शेतकरी परिसंवाद आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय रघुनाथ दादा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष सीफा यांची प्रमुख उपस्थिती होती.वाखाण रोड कराड येथील कार्यक्रमास दादांचे स्वागत अध्यक्ष जिल्हाध्यक्ष रोहित सूर्यवंशी व उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले.वाकान रोड कराड येथे शेतकरी परिसंवाद चर्चेत दादांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले ते बोलताना म्हणाले,देशातील शेतकऱ्यांची आज ही परिस्थिती बदलली नाही. उसाच्या दरात वाढ फसवी आहे. 8.5% उतारा बेस वरून सध्या 10.25 टक्के उताऱ्याला दर मिळत आहे. राजकर्ते कारखानदाराकडून शेतकऱ्यांना फसवणुकीची परिस्थिती झाली आहे. त्यासाठी सरकारने इथेनॉल प्रकल्पासाठी 25 किलोमीटरची अट रद्द केली पाहिजे.
त्याच्यातील स्पर्धेतून शेतकऱ्याला ऊसाला दर मिळणार आहे.सध्या राज्यात 25 कुटुंबाच्या हातात सर्व कारखानदारी आणि इथेनॉल प्रकल्प गेली आहेत.इथेनॉल प्रकल्प एक खिडकी योजनेचे स्वागतच आहे.मात्र सध्या काही साखर कारखान्याची मक्तेदारी आणि एकाधिकारशाही इथेनॉल उत्पन्नात झाली आहे .ही मक्तेदारी कमी करत स्पर्धा वाढवण्यासाठी साखर कारखान्याबरोबर नव्या नव्याने होऊन घातलेले इथेनॉल प्रकल्पवरील अट रद्द करावी असे शेतकरी परिसंवाद व चर्चा या कार्यक्रमात बोलत होते. मुंडे गावातील शेतकरी परिसंवाद व चर्चा मेळाव्यात संध्याकाळी सात वाजता मुंडे गावात दादाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मुंढे गावात पाटील म्हणाले,देशातील कोणत्याही सरकारला शेतकऱ्याचे भले करावे असे वाटत नाही.त्यात अत्यावश्यक कायदा आडवा येत आहे निर्यात धोरणी कारणीभूत आहे. 1980 मध्ये तीन टन उसाच्या पैशात तीन टन उसाच्या पैशात एक तोळा सोने खरेदी करता येत होते.आजच्या परिस्थितीत शेतीमालाच्या दराची भाव पातळी त्या पटीत वाढली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतील नाही तर काय?
एक लिटर गाईचे दूध विकल्यानंतर एक लिटर पेट्रोल खरेदी करता येत होतो. सध्या उसाचा भाव अडीच ते तीन हजार रुपये प्रति टन आहे सोन्याचा भाव साठ हजार रुपये आहे. पेट्रोलचा भाव शंभर रुपयाच्या पुढे आहे तर दुधाचा भाव चाळीस रुपये लिटर आहे उसाच्या दरात आणि सोन्याच्या तसेच उसाच्या दरात आणि सोन्याच्या तसेच शेतकऱ्याला आवश्यक असणारी तर वस्तूच्या दरात फार मोठी तफावत निर्माण झाली आहे .ही भाव पातळी १९८० सालच्या तुलनेत पाहिजे होती. शेतीमालाची भाव पातळी त्या पटीत वाढली नाही सोन्याचा भाव दर 60000 रुपये होत असेल तर उसाचा ऊसाला वीस हजार रुपये भाव का होत नाही आम्ही उसाला 20000 रुपये भाव मागितल्यावर लोकांना हसू येते परंतु वस्तुस्थिती आहे. दोन कारखान्यातील अंतर अट रद्द करा. वन्य प्राणी संरक्षण कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे शिराळ्याचा नागपंचमी सण बंद पडला आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. एफ आर पी कारखान्याने वेळेत न दिल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा कायदा आहे असे प्रतिपादन केले.यावेळी संस्थेचे संस्थापक बाळाराम माडकर म्हणाले, शेतकर्यांना कायदयाची माहीती व शोषण कोण करत आहे याची माहीती व्हावी.आमचे शेतकरी दिवस रात्र राबतात तरी कर्जाचा डोंगर संपत नाही.हालाखीचे जगण जगावे लागत आहे. राज्यात विविध ठिकाणी शेतकरी परिसंवाद व चर्चा आयोजित करण्यात येणार आहेत अशी घोषणा केली.यावेळी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बाळाराम माडकर व प्रदेश उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील, माजी सरपंच आनंदराव जमाले, उपसरपंच सागर पाटील वहागाव चे सरपंच संग्राम पवार, जिल्हा सातारा जिल्हा अध्यक्ष रोहित सूर्यवंशी कृष्णाकाठ प्रतिष्ठानचे प्रा अमितराज माने,कैलास साळवे ,शुभम चव्हाण प्रथमेश, माळी उदयसिंग साळवे, एकनाथ सावंत ,प्रशांत भोसले ,मोहम्मद कोकणे ,प्रशांत साळवे ,संकेत साळुंखे ,विश्वजीत पाटील ,सचिन पाटील , कृष्णत पाटील ,बाळासाहेब सूर्यशवंशी, राजाराम पाटील तसेच गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.