Home पश्चिम महाराष्ट्र किट्टी आडगाव येथे महिलांचा सन्मान करुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

किट्टी आडगाव येथे महिलांचा सन्मान करुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

58

पुणे(प्रतिनिधी)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त ग्रामपंचायत किट्टी आडगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करुन सामाजिक,आरोग्य, महिला व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या सौ. सुभद्रा रोहिदास आगे व सौ. सुषमा पदमाकर देशमुख या दोन महिलांना शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात आला. तसेच याच क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या आठ महिलांचा सन्मान ग्रामपंचायत किट्टी आडगाव मार्फत करण्यात आला. यावेळी सरपंच रुकमानंद खेत्रे,उपसरपंच गोविंद आगे,ग्रामविकास अधिकारी महेश गेंदले,माजी.सरपंच व ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आगे,ग्रामपंचायत सदस्य भगवान ससाणे, तंटामुक्ती अध्यक्ष पाराजी आगे,माजी चेअरमन शंकर आगे,वृंदावनी आगे,मनीषा रासवे,महानंदा आगे, ग्रामपंचायत कर्मचारी आसाराम आगे, मुंजाभाऊ झिंगे,उध्दव कदम,संगणक परिचालक डिंगाबर आगे,पत्रकार रामराव आगे,पद्माकर देशमुख,नारायण आगे,दिलीप आगे सह

गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला उपस्थित होत्या.