Home विदर्भ “चक्क वण जमिनीची माती वीटभट्टी वर” , वरूड येथील वण जमिनीतील प्रकार

“चक्क वण जमिनीची माती वीटभट्टी वर” , वरूड येथील वण जमिनीतील प्रकार

106
वर्धा (जिल्हा प्रतिनिधी )
मौजा वरूड येथे वण जमिनीवर जमीन सपाटीकरण करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असताना येथील मुरमत माती चक्क विट भट्टी वर ट्रकच्या साहाय्याने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे कुंपणच शेत खायला लागले असे म्हणावे लागत आहे.
वरूड सेवाग्राम रस्त्या लागत असलेल्या शेत सर्व क्रमाक येथे जमीन सपाटीकरण करून येथे वृक्ष लागवड करण्यासाठी पोकलंड च्या साहाय्याने खोदकाम सुरू आहे. खोद कामातील मुरूम ,माती हा लगतच्या सागर तलावाच्या काठावर टाकण्यासाठी कंत्राटदाराला आदेश असताना कंत्राटदाराने दिवसाढवळ्या ट्रक भरून माती खरांगणा गोडे रस्त्यावर अंबानगर येथील विट भट्टी वर टाकल्या जात आहे. त्यामुळे वण विभाग माती विताभट्टी व्यवसायिक विकतात का असा सवाल नागरिक करीत आहे.
ज्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे त्या ठिकाणी जमिनीचा वरील थर हा विट भट्टी करीता वापरण्या जोगा असल्याने यावर येथील विट भट्टी व्यावसायिक डोळा ठेऊन कंत्राटदाराला हाताशी घेऊन वनविभागाच्या डोळ्यात धूळ झोकून सर्रास माती विकत आहे.
प्रस्तुत प्रतिनिधी यांनी मौका वर जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
मात्र या प्रकाराकडे संबंधित वण विभाग अनाभिंन आहे.याबाबत वरूड येथील वणरक्षक प्रशांत कनेरे तसेच तालुका उपवण परिक्षेत्र संरक्षण अधिकारी रुपेश खेडकर यांनी विचारणा केली असता माती अथवा मुरूम कुणालाही विकला नाही किंवा दिला नाही असा प्रकार झाला असल्यास त्याची चौकशी करून कारवाई करणार असे सांगितले. मात्र यावर वण विभाग काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.