नळ योजनेच्या यशस्वी संचलानासाठी
ग्रामपंचायतीला क्षमता बांधणी प्रशिक्षण.
जव्हार प्रतिनिधी-मनोज कामडी.
ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला नळद्वारे ५५ लिटर शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे व ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरुन त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागु नये या हेतुने जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद पालघर चे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच प्रकल्प संचालक जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांच्या मार्गदर्शना खाली राज्यस्तरावरुन नेमण्यात आलेल्या मुख्य संसाधन केद्र अंतर्गत दक्ष फाउंडेशन जबलपुर यांच्या मार्फत पंचायत समिती पालघर अंतर्गत १३३ ग्रामपंचायतीचे ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती यांचे प्रति ग्रामपंचायत ५ सदस्य यांचे प्रशिक्षण सुरु संपन्न झाले
सदर प्रशिक्षणास ग्रामपंचायत चे सरपंच, ग्रामसेवक, समिती सदस्यामधील आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती, महिला बचत गटाच्या महिला हया मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या व दोन दिवसीय प्रशिक्षणा उत्स्फृत पणे प्रतिसाद मिळाला. सदर प्रशिक्षणा मुख्य संसाधन दक्ष फांडेशन यांच्या मार्फत जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबलावणी साठी प्रशिक्षणामध्ये जल जीवन मिशन कार्यक्रमाची उद्दिष्ट, कार्यपध्दती, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या भुमिका व जबाबदा-या नळ योजना ची देखभाल दुरुस्ती, पाण्याचे अंदाजपत्रक योजनेचे आर्थीक , तांत्रिक व सामाजिक सनियंत्रण सांडपाणी व्यवस्थापन आणी लोकसहभाग इ. महत्वाच्या महत्वाच्या विषयावर विविध साधन व्यक्तिद्वारे मार्गदर्शन केले.तसेच सदर प्रशिक्षणा महिलांचा सहभाग मोठया प्रमाणात दिसुन येत आहे.