हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन अंतर्गत सालोड (हि ) येथे मंजूर 1कोटी 1लक्ष रु चा माद्यमातून नवी उमेद फार्मर प्रोड्युसार कम्पनी ला गोडाऊन बांधकाम भूमिपूजन व महिला बचत गट लोकार्पण चा अनुसरून ग्रामपंचायत सालोड द्वारा वट पौर्णिमेच्या अवचित्य साधून होतकरू महिलांचा सावित्री सन्मान आयोजित केला होता त्या प्रसंगी
उद्घाटक म्हणून खा. रामदासजी तडस, कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. डॉ. पंकज भोयर, विशेष अतिथी मा सौं सरिता गाखरे माजी जी प अध्यक्ष, सौं वैशाली येरावार, माजी उपाध्यक्ष जी प वर्धा, सौं सरस्वती मडावी, माजी सभापती, जी प वर्धा, सरपंच अमोल कन्नाके, उपसरपंच आशिष कुचेवार, वरुड चा सरपंच सुनीता ढवळे, जिल्हा प्रकल्प अधिकारी विश्वास सिद, म रा जी अभियान जिल्हा व्यवस्थापक स्वाती वानखेडे भाजपा तालुका महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा ठाकूर ग्रापं सदस्य मनोज देवघरे, अतुल जुडे, सुरेश ठाकरे, पुनित चरडे, अमोल वंजारी, लोकेश मडावी, वैशाली महेशगौरी, विद्या भुसारी, प्रेमिला तेलरांधे, माया रघाटाटे, नलिनी मडावी, वैशाली सेवेकर,योगिता बोरसरे, प्रणिता लोणकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना खा.रामदासजी तडस म्हणाले की, आमदार जर कर्तव्य दक्ष अस की मतदार क्षेत्राचा विकास होतो. मागील आठ वर्षात सालोड गावाचा जो विकास झाला आहे तो आजपर्यंत कधीच झाला नाही. गावाच्या विकासासाठी आ. भोयर सातत्याने निधी देत आहे. आज सुद्ध महिलाचा हक्काचे घर व महिलांना उद्योग क्षेत्रात भरारी देण्यासाठी कोट्यावढी कामांचे भूमीपुजन व लोकार्पण होत आहे. महिलांना उद्योजक झाल्यावर त्यांच्या मालाची योग्य बाजार मध्ये बाजारात किंमत व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर राहू असे आ भोयर यांनी सांगितलं,
माजी जी प अध्यक्ष सरिता गाखरे म्हणाल्या कि आ भोयार यांनी संपूर्ण विधानसभा क्षेत्रात महिलांना आपल्या बचत गट चाळवळ पुढे नेण्यासाठी जे हक्काचे बचत गट भवन साकरण्यासाठी जो प्रयत्न केला तो महाराष्ट्र मधील एकमेव आमदार असेल कि विधानसभा क्षेत्रात इतके बचत गट भवन सकरण्यात आले त्याबद्दल त्यांनी आ भोयर यांचे आभार मानले
यावेळी सक्षम प्रभाग संघ चा अध्यक्ष सौं आरती सूर्यवंशी यांनी दिलेला शब्द पूर्ण करून दिलाबद्दल आ भोयर यांचा सन्मान करून आभार मानले,
यावेळी पाहुण्यांचा हस्ते वट पौर्णिमेच्या आवाचित्यावर होतकारू महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये नजमा अहमदखा पठाण, शिला धोरण, ज्योती वैतागे, कल्पना वाघ विठाबाई मडावी आदी महिलांना पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांचा 9वर्ष पूर्ती निमित्य सन्माणीत करण्यात आले, या कार्यक्रम ला यशस्वी करण्यासाठी तालुका समन्वयक विलास झोटिंग, सौं कोहळे,प्रास्ताविक आशिष कुचेवार,संचलन वंदना वाघ, आभार अनिता मस्के यानी मानले
यावेळी विविध बचत गट मधील महिला, गावातील नागरिक, मोठया संख्येने उपस्थिती होते.