Home यवतमाळ कुर्ली येथे विनयभंग केल्याप्रकरणी 9 आरोपी विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

कुर्ली येथे विनयभंग केल्याप्रकरणी 9 आरोपी विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

91

( अयनुद्दीन सोलंकी )

————————–
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुर्ली येथे एका पस्तीस वर्षीय महीलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी रमेश राठोड (वय 52), रंजित राठोड (वय 25), दुलसिंग राठोड (वय 60), मुलचंद राठोड (वय 63), रेणुका राठोड (वय 48) या सह 9 आरोपी विरुद्ध भादंवि कलम 354, 324, 143, 147, 149 व 427 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) विनोद चव्हाण हे करित आहे.

फिर्यादी पस्तीस वर्षीय महिला कुर्ली येथील रहिवासी असुन त्याच्या परिवारातील सदस्याच्या नांवे गांव नमुना 8अ असुन जमीन आहे. जागे बाबत रमेश राठोड, रंजित राठोड, मुलचंद राठोड, दुलसिंग राठोड, रेणुका राठोड व इतरांनी नेहमी वाद उपस्थित करतात. या पुर्वी सुद्धा यांचे विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात रिपोर्ट दिला होता.

6 जुन रोजी सकाळी 9.00 वाजता आम्ही घरी असतांना रमेश राठोड, रंजित राठोड, मुलचंद राठोड, दुलसिंग राठोड, रेणुका राठोड सर्व रा. गोविंदपूर व त्यांच्या सोबत इतर 5 ईसम आले व आम्हाला म्हणाले की,ही जागा आमची आहे. तुम्ही येथे कोठा कसा काय बांधला या कारणावरुन वाद करु लागले.तेव्हा, आम्ही त्यांना समजावून सांगितले की, ही जागा आमची आहे. पण त्यांनी आमचे काहीही ऐकले नाही. उलट आम्हाला म्हणाले की, तुमचा कोठा आत्ताच्या आत्ता काढून घ्या असे म्हणुन आमचा कोठा पाडुन टाकला. व महिलेला व त्याच्या पतीला ढकलुन दिले. त्यानंतर आरोपी रंजित राठोड याने डाव्या हातावर मारहाण केली. त्यामुळे हातावर सुज आली. त्यानंतर महिलेच्या छातीवर हात ठेवून तिला ढकलुन दिले. अशा रिपोर्ट वरुन पारवा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या गटाच्या तक्रारीवरुन जाधव कुटुंबिया विरुदध सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पुढील तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) विनोद चव्हाण हे करित आहे.