Home यवतमाळ घाटंजी वन परिक्षेत्र कार्यालयातंर्गत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड..!

घाटंजी वन परिक्षेत्र कार्यालयातंर्गत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड..!

51

➡️ मुख्य वन संरक्षक, दक्षता पथकाचे उप वन संरक्षक यांनी सागवान झाडाची पाहणी करण्याची मागणी..!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी : घाटंजी येथील वन परिक्षेत्र कार्यालयातंर्गत मुर्ली शिवार, साखरा, कापसी, कोळी आदीं ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असुन अनेक सागवान लाकडावर नियमानुसार हॅमर (हातोडा) मारल्या जात नाही. विशेष म्हणजे वन परिक्षेत्र अधिकारी, वन क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक हे घटनास्थळी न जाता जागेवरुनच पंचनामे करत असल्याने एका गट नंबरची परवानगी काढून लगतच्या वन विभाग व महसुल विभाग जंगलातील सागवान वृक्ष अवैध रित्या तोड करत आहे. सर्वे नंबर वा गट नंबर मधील सागवान झाडे जर तोडायची असेल तर वन विभागाचे दर सुद्धा ठरलेले आहे. त्यामुळे ठरलेल्या दरानुसार रक्कम दिली नाही तर वन विभागाकडुन अजिबात कारवाई केल्या जात नाही.

वन विभागाच्या नियमानुसार एखाद्या सर्वे नंबर वा गट नंबर मधील सागवान झाडाची तोड करायची असल्यास, तोड केलेल्या सागवान लाकडावर थुट, बुड व शेंडयावरील भागावर हॅमर (हातोडा) मारल्या जाते. विशेष म्हणजे सागवान लाकडावर एक तर प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी यांनीच सागवान लाकडावर हॅमर (हातोडा) मारने आवश्यक आहे. मात्र, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी हे हॅमर मारण्यासाठी बाहेर जात नाही. तोड झालेल्या सागवान लाकडावर वन क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक वा वन चौकीदार यांच्या हाताने नियमबाह्य हॅमर (हातोडा) मारल्या जाते. त्यातच तोड करण्यात आलेल्या अनेक सागवान लाकडावर हॅमर मारल्या जात नाही.

तसेच पांढरकवडा उप वन संरक्षक कार्यालयातंर्गत मोठ्या प्रमाणात एका गट नंबरची परवानगी काढून 5/6 गट नंबरचे सागवान लाकडे अवैध रित्या तोड केल्या जात आहे. वास्तविक पाहता, एखाद्या वाहनात एकही सागवान लाकडावर हॅमर (हातोडा) नसला तर पुर्ण सागवान लाकडे वाहनासह जप्त करण्यात येते. मात्र, घाटंजी वन परिक्षेत्र कार्यालयातंर्गत मोठ्या प्रमाणात शासकीय जंगलातील सागवान लाकडाची तोड सुरू आहे. त्यामुळे सदर प्रकरणात यवतमाळ येथील मुख्य वन संरक्षक यांचे पथक, दक्षता विभागाचे उप वन संरक्षक यांनी घाटंजी वन परिक्षेत्र कार्यालयातंर्गत सागवान लाकडाची पाहणी करुन तसेच सागवान लाकडे जप्त करुन घाटंजी येथील वन परिक्षेत्र अधिकारी, संबंधित वन क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक इत्यादी विरुद्ध वन विभागाच्या नियमानुसार तत्काळ कारवाई करावे अशी मागणी होत आहे.