फुलचंद भगत
वाशिम:-समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंदयावर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलात तर्फे सतत कार्यवाही सुरु असतात त्याच पार्श्वभुमीवर वाशिम जिल्हयात अवैधरित्या चालत असलेल्या दारु विक्री व वाहतुकीवर पायबंद घालण्याकरिता जिल्हयात विशेष मोहिम राबविण्यात आली.
त्या अनुषंगाने दिनांक 11/06/2023 रोजी मा. जगदीश पांडे उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा चार्ज मंगरुळपीर यांचे मार्गदर्शनात ए.एस.आय. मानिक चव्हाण ब.क्र.549,यांनी पो.स्टाफ पो.हे. कॉ. रविद्र कातखेडे ब. क्र. 747, पो.कॉ. रामेश्वर राऊत ब. क्र. 05, पो.कॉ. इस्माईल कालीवाले ब. क्र. 351, पो.कॉ. मंगेश गादेकर ब. क्र. 88 चालक पो.कॉ. अनिल हमाने ब.क्र. 1441 यांनी अवैध दारु वाहतुक करणा-या चालक मोहीत संजय लुल्ला यांचेसह 80960/- रुयाची देशी विदेशी दारु एक चार चाकी वाहन व मोबाईल किमंत अंदाजे– 330000/- अशा एकुण 410960/- मुददेमाल जप्त करण्यात आला. आरोपीवर कलम 65 ई महाराष्ट्र दारु बंदी कायदया अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे.
सदर ची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक वाशिम श्री. बच्चन सिंह(IPS) यांच्या मार्गदर्शनाने जगदीश पांडे उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा चार्ज मंगरुळपीर यांचे मार्गदर्शनातए.एस.आय. मानिक चव्हाण ब. क्र.549, यांनी पो.स्टाफ पो.हे.कॉ. रविद्र कातखेडे ब.क्र. 747, पो.कॉ. रामेश्वर राऊत ब. क्र. 05, पो.कॉ. इस्माईल कालीवाले ब. क्र. 351, पो.कॉ. मंगेश गादेकर ब. क्र. 88 चालक पो.कॉ. अनिल हमाने ब. क्र. 1441 यांनी केली.मा. पोलीस अधिक्षक वाशिम श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी सर्व जनतेस सुजान नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती दयावी.त्या ईसमाचे नाव गोपणीय ठेवण्यात येईल असे आव्हान केले आहे.