Home यवतमाळ तिरंगा चौकातील अवैध पायरी वरती लक्ष कोणाचे…??

तिरंगा चौकातील अवैध पायरी वरती लक्ष कोणाचे…??

66
विनोद पञे
यवतमाळ – यवतमाळ शहरातील तिरंगा चौक येथील बँक ऑफ इंडियन ओव्हरसीज या बँकेने त्यांचा जिना (पायरी) ही भर रस्त्यावर अवैधरित्या टाकलेली असून त्यांच्यामुळे तिथून येजा किंवा उन्हामुळे गाडी ठेवण्यास त्या बँकेकडून मज्जाव केला जात असून त्या बँकेच्या त्या सार्वजनिक रस्त्यावर लोखंडी जिना बांधण्याची परवानगी कोणी व कशी दिली आहे.
तसेच गोरगरिबांचे रस्त्यावरील दुकाने नगरपरिषद प्रशासन कुठलाही विचार न करता अतिक्रमण हटवते तेव्हा बँकेचे हे अनधिकृत अतिक्रमण व या इमारतीवरील लोखंडी होल्डिंग सुद्धा अवैध आहे. न.प.यवतमाळ बांधकाम विभागाच्या चाणाक्ष नजरेतुन कशाप्रकारे सुटले याचे आश्चर्य आहे. या करिता आपण यावर स्वतः जातीने लक्ष घालून योग्य कारवाई करणार का अश्या प्रकारचे निवेदन सामाजिक कार्यक्रर्ते विकास माटघरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषद यवतमाळ यांना दिले असुन प्रशासन यावरती कुठली कारवाई करणार….!