Home यवतमाळ येळाबारा येथील अल्पवयीन मुलीस पळवुन नेल्या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत...

येळाबारा येथील अल्पवयीन मुलीस पळवुन नेल्या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल..!

56

(अयनुद्दीन सोलंकी)

————————
घाटंजी, 25 जून – येळाबारा येथील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्या प्रकरणी आरोपी अक्षय देवराव भोयर (वय 25) विरुद्ध भादंवि 363, 376, 376 (2) (n), बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 कलम 4, 8 अन्वये घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घाटंजी पोलीसांनी आरोपी अक्षय भोयर यांस अटक केली असुन त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीची आई ममता शंकरलाल कश्यप (वय 45) हिच्या रिपोर्ट वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

23 जुन रोजी सकाळी 10.30 वाजता मी, माझी मोठी मुलगी व अल्पवयीन मुलगी हिची प्रकृती दाखवण्यासाठी घाटंजी येथील डॉ. बोंडे मॅडम यांच्या खाजगी इस्पितळात गेलो होतो. अल्पवयीन मुलीचे पोट दुखत असल्याने तिची प्रकृती तपासण्यात आली. या वेळी डॉ. बोंडे मॅडम यांनी सांगितले की, तुमची मुलगी तीन महीण्यापेक्षा गरोदर आहे. खात्री करण्यासाठी तीची सोनोग्राफी करून घ्या, असा सल्ला तिने दिला. त्या नंतर तिने सांगितले की, मागील 6/7 महिण्यापासुन गावातील अक्षय देवराव भोयर (वय 25) याचे सोबत प्रेम संबंध आहे व त्याने लग्नाचे आमिष दिलेले आहे.

दरम्यान, दुपारी 12 वाजता येळाबारा येथे राहणारा अक्षय भोयर व त्यांचे सोबत शैलेश दयाशंकर त्रिपाठी हे दोघेही मोटर सायकल ने त्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांजवळ आले व अक्षय भोयर याने सांगितले की, मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो. मी तिच्या सोबत लग्न करण्यास तयार आहे, असे म्हणून तिला मोटर सायकल वर बसवुन पळवुन नेले.

घाटंजी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुषमा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विलास सिडाम पुढील तपास करीत आहे.