Home पालघर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार गावित यांची डहाणू-कासा-जव्हार-मोखाडा-नाशिक या रेल्वे...

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार गावित यांची डहाणू-कासा-जव्हार-मोखाडा-नाशिक या रेल्वे मार्गासाठी आग्रही मागणी

88

जव्हार :-सोमनाथ टोकरे

जव्हार: पालघर लोक सभा खासदार राजेंद्र गावित यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वे मार्ग हा ग्रामीण भागातून जोडल्यास विकासाच्या दृष्टीने लाभदायक ठरेल हे ओळखून केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथील रेल भवन येथे सकाळी ११.३० वाजता भेट घेत डहाणू-कासा-जव्हार-मोखाडा-नाशिक या रेल्वे मार्गासाठी निवेदन देवून आग्रही मागणी केली असून याबाबत रेल्वे मंत्री सकारात्मक असल्याचे गावित यांनी बोलताना सांगितले.
खासदार गावित यांनी डहाणू – कासा -जव्हार – मोखाडा – नाशिक या नव्या रेल्वे मार्गासाठी विशेष भेट घेवून रेल्वे कशी फायद्यात राहील या साठी पर्यायी व्यवस्थेबाबत निवेदन दिले शिवाय, मागील २ सर्वे मधे हा रेल्वे मार्ग तोट्यात असल्याचे निरीक्षणात नोंदविले होते, यावर पर्याय म्हणुन (MREGS) मध्ये अकुशल कामातुन रेल्वे मार्ग करुन व कुशल कामामध्ये बाकीचे पुल तसेच इतर काम करून येथील गंभीर समस्या बालमृत्यु, कुपोषण थांबवण्यासाठी भारत सरकार (MNREGA) या योजनेतून १६५ दिवस व (MREGS) महाराष्ट्र शासन या योजनेमधुन १६५ दिवस रोजगार उपलब्ध होईल व ३३० दिवस कमीत कमी १० वर्षासाठी रोजगार मिळून हा रेल्वेमार्ग आदिवासी भागासाठी वरदान ठरू शकेल असे गावित यांनी चर्चेतून निदर्शनास आणून दिले.त्यानुसार या बाबीकडे पाहून येथील भागात रोजगार उपलब्धता होऊन एक चांगली सुविधा निर्माण होणार असल्याने येथील जन जीवन प्रफुल्लित होईल या उद्देशाने हा नवा रेल्वे मार्ग फलदायी ठरणार असल्याने रोजगाराच्या दृष्टीने केंद्रीय रेल्वे मंत्री यांचे लक्ष गावित यांनी वेधले असता त्यांनी हा मार्ग सुरू करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.
शिवाय राज्यात देखील या रेल्वे मार्गा बाबत हिरवा कंदील देण्यात आला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दूरदृष्टी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भारत सरकार तसेच केद्रं सरकार निधी उपलब्ध कसा होईल यासाठी विशेष प्रयत्न करावे अशी विनंती केली त्यात त्यांनी आदिवासी भागासाठी मदत करण्याचे कबूल केले असल्याचे खासदार गावित यांनी माहिती दिली.
दरम्यान, बोगदे व मोठे पुल या साठी भारत सरकार व महाराष्ट्र शासन पैसे उभे करण्यासाठी विशेष प्रयत्न करून हा रेल्वे मार्ग कुपोषण तसेच रोजगार ग्रामीण भागातील सर्वांगिण विकास तर होईलच परंतु हा प्रकल्प या भागाचा कायापालट करेल व या साठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ,अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री व महाराष्ट्र शासन आदिवासी भागाच्या पाठीशी उभे राहुन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आग्रही असल्याचे मान्य केले .
यावेळी खासदार राजेंद्र गावित यांच्या समवेत चर्मकार आयोगाचे सदस्य विनित मुकणे, सामाजिक कार्यकर्ते स्नेहल मुकणे , मंगेश मुकणे हे उपस्थित होते.

*चौकट* डहाणू-कासा-जव्हार-मोखाडा-नाशिक हा नवा रेल्वे मार्ग झाल्यास या ग्रामीण आदिवासी भागातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन शिक्षण,आरोग्य, रोजगार या बाबींचा दर्जा उंचावेल या उद्देशाने या रेल्वे मार्गाकडे पाहणे गरजेचे असल्याने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून या नव्या रेल्वे मार्गाचा शुभारंभ लवकर होईल यात शंका वाटत नाही.या रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी मी स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री , पंत प्रधान कार्यालय व राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे या नव्या रेल्वे मार्गासाठी सविनय मागणी करताना खासदार राजेंद्र गावित यांच्या सोबत उपस्थित होतो.
— *विनीत मुकणे,सदस्य, चर्मकार आयोग, महाराष्ट्र राज्य*