Home विदर्भ आमदार चषक कबड्डी स्पर्धेचा जल्लोषपूर्ण वातावरणात बक्षीस वितरण संपन्न

आमदार चषक कबड्डी स्पर्धेचा जल्लोषपूर्ण वातावरणात बक्षीस वितरण संपन्न

497

कारंजा प्रतिनिधि

वाशिम , दि. ०४ :- आमदार चषक ४६ वी ज्युनिअर विदर्भ राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी ( मुले /मुली ) स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि.२ फेब्रुवारी २०२० रोजी तालुका क्रीडा संकुल,कारंजा(लाड) जि.वाशिम येथे आमदार रणधीर सावरकर यांचे शुभहस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारंजा मानोरा विधानसभाचे लाडके आमदार तथा जिल्हाध्यक्ष,भाजपा राजेंद्रजी पाटणी व विशेष अतीथी म्हणून जितेंद्रसिंह ठाकूर(सचिव, अम्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ ) राजू पाटील राजे,प्रदेश उपाध्यक्ष,भाजपा युवा मोर्चा,आयोजक विजय पाटील काळे जिल्हा सरचिटणीस,भाजपा युवा मोर्चा जिल्हा वाशिम, ,सोमनाथजी जाधव,ठाणेदार कारंजा शहर,डिगांबरजी इंगळे,प्रा.विनय कोडपे,तालुका क्रीडा अधिकारी चंद्रकांत उपलवार,नितेश मलिक,शांतीलाल केसवानी,जुमडामलजी नागवणी,रमेश लाहे,मीनाताई काळे,शारदाताई बांडे,सुनीता नाखले, जि.प.सदस्य,पं.स.सदस्या सौ वैशालिताई काळे,चंदाताई कोळकर, नगरसेविका, प्रजक्तताई महितकर,नगरसेविका,अशोकराव देशमुख,सतीश डफळे,वसंतराव साबळे,रामभाऊ नवघरे,डॉ भागवत महाले,राजीव पाटील काळे,ज्ञानेश्वर* काळे,निरंजन करडे,संजय नेमाने,विजय बगडे,रुपेश शाहाकार,शुभम बोनके, मोहन पंजवानी,राहुल रवीराव,अनिल कानकिरड,राजीव भेंडे,विनोद जाधव,,संदीप गढवाले,संदीप काळे,शशीकांत नांदगावकर,राहुल गावंडे,संजय घुले,संजय गिरमकार,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मान्यवरांचे शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. रणधीर सावरकर यांनी आपल्या मनोगतात क्रीडा संकुल साठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.आपल्या अध्यक्षीय भाषणात राजेंद्र पाटणी यांनी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातील खेळाडूंच्या सुविधेकरिता भरीव निधी उपलब्ध करून देऊ व अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्याने आयोजित करण्याचा मानस या वेळी त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजय पाटील काळे तर सूत्रसंचालन विवेक गहाणकरी यांनी केले.
मुलांमध्ये चंद्रपूर व वाशिम यश दोन बलाढ्य संघात लढत झाली. मध्यांतरापर्यत वाशिम संघाकडे आघाडी होती मात्र मध्यंतरानंतर चंद्रपूर संघाने आक्रमक खेळ करत आघाडी मिळवत बाजी मारली. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याने प्रथम तर यजमान वाशिम संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तृतीय क्रमांकावर अमरावती व यवतमाळ संघ संयुक्तपणे राहिले तर मुलींमध्ये अकोला संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक अमरावती व तृतीय क्रमांकावर अनुक्रमे बुलढाणा व वाशिम हे संघ राहिले.संपूर्ण स्पर्धेत विदर्भातील ११ मुलांचे व ११ मुलींच्या संघाने सहभाग नोंदविला होता.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शशिकांत नांदगावकर, गुणवंत शिंदे,राजेश अढाऊ,संदीप काळे,बंटी डेंडूळे,संजय घुले,विजय गागरे,रंजित रोतेले,अजय पाठे,राजेश शेंडेकर,राम धर्माधिकारी शिवाजी गायकवाड,सुनील सुडके,सनी राऊत,राहुल गावंडे,दर्शन रोकडे,सनी काळे,धीरज डहाके,चैतन्य डहाके तथा श्री संत गजानन महाराज हॅण्डबॉल क्लबच्या खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले.