अमीन शाह ,
बुलडाणा
रायपुरमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन सण साजरे करतात. एकमेकांच्या सण उत्सवांमध्ये सहभागी होतात. येत्या दि २९ जूनला बकरी ईद असून त्याच दिवशी आषाढी एकादशी आहे. हे दोन्ही सण एकाच दिवशी आले असल्याने हिंदु समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर राखून गावामध्ये सामाजिक सलोखा कायम रहावा या दृष्टिकोनातून सर्व मुस्लीम बांधवांनी येणा-या बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करता पुढील दिवशी करण्याचा निर्णय एकमताने घेतला असुन एक आगळा वेगळा आदर्श मुस्लीम बांधवानी समजापुढे ठेवला आहे आणि अश्या स्वरूपाचे लेखी निवेदन सुध्दा मुस्लीम बांधवांनी पोलीस स्टेशन रायपूर येथे संपन्न झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत सादर केले. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत सर्वच स्तरातून होत आहे.
मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे स्वागत- ठाणेदार राजवंत आठवले
“
रायपूर हद्दीतील सर्व धर्मीय लोक एकमेकांच्या सण-उत्सव, सर्व महापुरुषांचे जयंतीमध्ये सहभाग घेऊन गावामध्ये सामाजिक सलोखा राखण्याकरीता पुढाकार घेत आलेले आहेत. आज रोजी मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचं स्वागत रायपूर पोलिस करीत आहे.”