जव्हार :-सोमनाथ टोकरे .
जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे पैकी टोखरखांड या गावचे रहिवासी असून आदिवासी भागातील जंगली वनस्पतीचे ओषधीं गुणधर्म अभ्यास असल्याने जव्हार, मोखाडा भागातील अनेक नागरिकांना अनेक आजारावर आयुर्वेदिक वैदु म्हणून उपचार पद्धती करत होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अनेक भागातील नागरिक वनस्पती जडीबुटी ओषधीं वनस्पती घेण्यासाठी ठाणे, पालघर जिल्हासह धुळे, नंदुरबार, नाशिक, इगतपुरी घोटी, याठिकाणी मोठ्या संख्येने उपचार घेण्यासाठी नागरिक त्याच्या घरी येऊन येत होते. असे पालघर जिल्ह्यातील नाव लौकिक मिळवले कै. रामा लखमा रंधा वय वर्ष ९० यांचे आज राहत्या घरी सकाळी कौलाळे टोखरखांड या मूळ गावी वयाच्या ९० व्या वर्षी दुःखद निधन झाले. तसेच त्याचे सामाजिक कार्य कौलाळे ग्रामपंचायत मध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाचा मूळ पाया रचला. तसेच या पंचकोशीत स्वतः पायी पायी चालून गावोगावी जाऊन वारकरी सांप्रदाय वाढवला. तसेच सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये गोरगरीब जनतेला नेहमी मदतीला धावून जायचे आणि धार्मिक कार्यामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असायचा.असा या परिसरातील एक नावाजलेल्या व्यक्तिमत्त्व असलेले कै.रामा रंधा यांच्यावर आज टोकर खाड मुळगावी वैकुंठ धाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, त्याचे मुले चंद्रकांत रंधा माजी उपसभापती ,गोपाळ रंधा, सुनिल रंधा, असा त्याचा एकत्र परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कौलाळे ग्रामपंचायत मध्ये टोखर खांड गावाचे नामवंत सामाजिक कार्यकर्ते व भगतवैदु यांच्या निधनाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया माजी ग्रामपंचायत सदस्य कौलाळे केशव टोकरे यांनी दिली.त्याच्या निधनाने संपूर्ण पंचकोशीत शोककळा पसरली आहे.