Home बुलडाणा श्री च्या पालखीचे विदर्भात सिंदखेडराजा येथे आगमन ,

श्री च्या पालखीचे विदर्भात सिंदखेडराजा येथे आगमन ,

74

 

भक्ती भावात करण्यात आले स्वागत ,

अमीन शाह  , बुद्धू चौधरी ,

 

सिंदखेडराजा

विदर्भातील सर्वांत मोठे तीर्थक्षेत्र असलेले मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील शेगावीचा राणा श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी प्रदीर्घ १३०० किमीचा प्रवास करून आज रविवारी विदर्भा चे प्रवेशद्वार सिंदखेडराजा येथे आगमन झाले विदर्भाच्या प्रवेशद्वारावर या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले

 

आज१६ जुलै रोजी दुपारी 4 वाजता मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर श्रीच्या पालखीचे आगमन झाले मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर आमदार डॉ , राजेंद्र शिंगणे , माजी आमदार डॉ , शशिकांत खेडेकर भाजप चे विनोद वाघ , मा, नगराध्यक्ष सीताराम चौधरी , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड , नाजेर काजी , आरेफ चौधरी , शेख यासिन , ठाणेदार वाघ , नायब तहसिलदार वऱ्हाडे , नगर पालिका मुख्यधिकारी यांनी पालखी चे दर्शन घेऊन स्वागत केले वारकऱ्यांच्या भोजनाची वयवस्था येथील रामेश्वर मंदिरात करण्यात आली ,
आध्यात्मिक चळवळीतील मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये श्रीच्या पालखीचे सालाबादाप्रमाणे याही वर्षी जंगी स्वागत करण्यात आले ,

सिंदखेडराजा येथून शेगाव येथे जाण्यासाठी पुढील प्रवास १७ जुलै रोजी किनगाव राजा, बीबी येथे मुक्काम त्यानंतर १८ जुलै रोजी किनगाव ज लोणार येथे मुक्काम १९ जुलै सुलतानपूर, मेहकर येथे मुक्काम २० जुलै नायगाव दत्तापूर, जानेफळ येथे मुक्काम २१ जुलै वरवंड, शिरला नेमाने येथे मुक्काम २२ जुलै विहिगाव, आवार येथे मुक्काम २३ जुलै रविवार खामगाव व २४ जुलै शेगाव येथे पालखीचे आगमन होणार आहेत.

आज सिंदखेडराजा येथे पालखीचे आगमन होताच भक्तिमय वातावरण पहायला मिळाला हजारो भाविकांनी श्री च्या पालखी चे दर्शन घेतले या वेळी मेहकर जालना मार्ग प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आला होता पालखी मार्गावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ,

 

विडिओ सौजन्य , गजानन म्हेत्रे ,

म्हेत्रे फोटो स्टुडीयो राजवाडा परिसर सिंदखेडराजा ,