Home सोलापुर नव्याने सोलापूर जिल्हा “पत्रकार संरक्षण समिती” कार्यकारणी निवडी व नियुक्ती जाहीर

नव्याने सोलापूर जिल्हा “पत्रकार संरक्षण समिती” कार्यकारणी निवडी व नियुक्ती जाहीर

134
  • पञकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणार्या…!

  • निरा नरसिंहपुर: दिनांक-21,  ( प्रतिनिधी डॉक्टर सिद्धार्थ सरवदे ) दिनांक 21 जुलै 2023 रोजी पत्रकार संरक्षण समिती सोलापूर जिल्ह्याच्या कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम नरसिंह मंदिर, निरा नरसिंहपुर येथे उत्साहात संपन्न झाला.

  • इंदापूर तालुक्यातील श्री.बाळासाहेब सुतार साहेब (पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा उपाध्यक्ष), श्री.डॉक्टर सिद्धार्थ सरवदे( पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा कार्याध्यक्ष),श्री. समाधान रजपूत (पत्रकार संरक्षण समिती इंदापूर तालुका कार्याध्यक्ष),धनाजी शेंडगे सर ,श्री. सतीश जगताप सर,आदी मान्यवरांच्या हस्ते सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून सुनील चांदणे (कुर्डवाडी), सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून संतोष पांढरे (मोडनिंब) तसेच जिल्हा कार्याध्यक्ष म्हणुन किशोर ओहोळ,जिल्हा सचिव म्हणून सिद्धनाथ सावंत यांची निवड करण्यात आली.

    त्याबरोबर च माढा तालुका अध्यक्ष म्हणून क्रांतीदीप लोंढे, तर सचिव पदी अमोल जाधव. करमाळा तालुका अध्यक्ष म्हणून भालचंद्र गाडे तर मंगळवेढा तालुका अध्यक्ष म्हणून अरुण शिंदे,तर उपाध्यक्ष पदी संभाजी कांबळे.

    आणि बार्शी तालुका अध्यक्ष पदी योगेश भालशंकर यांच्या ही निवडी व नियुक्त्या करून नियुक्ती पत्र , गुलाब पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

    सोलापूर जिल्ह्यातील नियुक्ती झालेल्या ही सर्वांनी मिळून ज्यांच्या मार्गदर्शन खाली हा सोहळा पार पडला त्यांचा म्हणजे डॉ. सिद्धार्थ सरवदे ( पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, पत्रकार संरक्षण समिती ) सत्कार केला.त्यावेळेस डॉक्टरानी आपले पत्रकार संरक्षण समिती विषयीचे मनोगत ही थोडक्यात मांडले. सदर कार्यकारिणी ही 2023 ते डिसेंबर 2024 पर्यंत राहील हे ही यावेळेस नमूद केले.

    त्याच बरोबर इतर पत्रकार व इंदापूर संरक्षण समिती यांचाही सत्कार केला.तद्नंतर सर्वांनी मिळून स्नेह भोजन घेऊन कार्यक्रम ची सांगता झाली.