“झील इन्स्टिट्यूट पुणे” आणि “कार्टुनिस्ट कंबाईन” यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्यंगचित्र रेखाटण्याचा “इंक अलाईव्ह” या कार्यशाळेचे आयोजन मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२० रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते.सदर कार्यशाळेत पुणे शहरातील ५३ शाळांमधील ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदवला.
कार्यक्रमाचे उदघाटन प्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री.शि. द. फडणीस यांच्या हस्ते पार पडले. त्यासोबतच कार्यक्रमाला व्यंगचित्रकार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.राज ठाकरे उपस्थित होते.”शिक्षणात पदवी महत्त्वाची आहे परंतु कलाकार पदवीशिवाय व्यक्त होऊ शकतो” असे मत त्यांनी व्यक्त केले. तर “दुसऱ्याच्या काळजाला हात घालण्याचे माध्यम म्हणजे चित्रकला आहे” असे मत कार्टुनिस्ट कंबाईनचे श्री. संजय मिस्त्री यांनी व्यक्त केले.
त्याचबरोबर श्री.फडणीस सरांनी प्रत्यक्ष व्यंगचित्र रेखाटून, व्यंगचित्राबद्दलचे बारकावे आपल्या चित्रातून आणि शब्दातून मांडले.श्री.चारुहास पंडित, श्री.घनश्याम देशमुख, श्री.प्रशांत कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या कार्यशाळेचे व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना रोख रक्कम 50 हजार रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहेत तसेच या चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरच्या कलादालनात दिनांक 5 फेब्रुवारी व 6 फेब्रुवारीला खुले ठेवण्यात येणार आहे.
यावेळी झील इन्स्टिट्यूट चे संस्थापक श्री.एस.एम काटकर,सचिव श्री.जयेश काटकर व कार्यकारी संचालक श्री.प्रदीप खांदवे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी सर्व आवश्यक साहित्य ‘ कोरस’ कंपनीकडून पुरवण्यात आले .