Home महत्वाची बातमी शिक्षणाचा अति ताण विद्यार्थिनीचा भर वर्गातच मृत्यू ,

शिक्षणाचा अति ताण विद्यार्थिनीचा भर वर्गातच मृत्यू ,

121

 

 

अमीन शाह

आपली मुलं शिकून मोठी व्हावीत हे स्वप्न प्रत्येक पालकाचं असतं. परंतु जीवघेण्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्याला दिवसभराची शाळा, कोचिंग क्लासेस आणि उरलेल्या वेळेत होमवर्क यामुळे विद्यार्थ्यांना शारिरीक आणि मानसिक प्रचंड ताण येत आहे. अशाच ताणतणावातून बीड शहरातील एका प्राध्यापकाच्या नववीत शिकत असलेल्या मुलीचा शाळेत वर्गात डेक्सवर बसलेली असतांना हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने अनेकांना धक्का बसला आहे. अभ्यासाच्या धास्तीने शारिरीक नुकसान आणि प्रचंड मानसिक तणाव यामुळे हा प्रकार झाल्याचे समोर आले. माझ्या मुलीच्या संदर्भात जी दुर्दैवी घटना घडली ती कोणाच्याही वाट्याला येऊ नये अशी कळकळीची प्रतिक्रिया मुलीच्या वडिलाने बोलतांना व्यक्त केली आहे. यातून आपल्या पाल्यांना मशीन प्रमाणे शिक्षणाची दैनंदिनी पार पाडायला लावणान्या पालकांनी गंभीर होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार रमशा शेख हिचे वडील एका विध्याल्यात प्राध्यापक आहेत घटना घडली त्याच्या आदल्या रात्री मृतक विद्यार्थीनि रात्री एक वाजता पर्यंत अभ्यास करत बसली होती अन , सकाळी उठून ती शाळेत गेली अन ही घटना घडली ,

एवढी सक्ती का ???

सकाळी झोपेतून उठले की शाळेची आवराआवर. शाळेतून येत नाही तोच क्लासेसला जाण्याची घाई, तिथून आले की जेवण करून लगेच होमवर्कला बसायचे. शाळेचा, क्लासेसचा होमवर्क करायचा, त्याच बरोबर हअभ्यासक्रमा व्यतिरिक्त शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेचीही तयारी करायची. सीबीएसई, स्टेटबोर्ड अशी विविध पुस्तके त्यांच्या समोर आणून मांडायची आणि त्यांना अभ्यासची सक्ती करायची हे योग्य नाही. ती तुमची मुलं आहेत मशीन नाहीत हे पालकांनी लक्षात घ्यावे. प्रत्येक वेळी हे कर, ते कर, अभ्यासाला बस अशी सक्ती केली जाते. यामुळे विद्यार्थी जास्त ताणतणावात येत असून त्यातूनच असे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध व्हावे.

रविवारी ही सुट्टी नाही ,

रविवारी शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असते. ८ दिवस शेतात, बांधकामावर राबराब राबणाऱ्या मजुरांनाही एक दिवस सुट्टी दिली जाते, मात्र कोचिंग क्लासेसवाल्यांकडून रविवारी टेस्ट सिरीज घेतली जाते. विद्यार्थ्यांना किती मार्क पढले हे पालकांना लगेच एसएमएस करून सांगितले जाते. कमी मार्क पडले की पालक विद्यार्थ्यांवर राग काढतात आणि याचा सर्व परिणाम विद्यार्थ्याच्या शारिरीक आणि मानसिक स्वास्थावर होत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे केवळ अभ्यासच नाही तर रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पालकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी निवडीनुसार मैदानी खेळ तसेच विरंगुळा म्हणून पर्यटन केले पाहिजे.

होमवर्कची सक्ती नको ,

शाळा, पलासेसचे होमवर्क करतांना मुलांच्या नाकीनऊ येतात. वेळेचे नियोजन करतांनाही त्यांची दमछाक होत आहे. होमवर्क न केल्यास शिक्षा केली जात नाही. मात्र वर्गाच्या बाहेर उभे केले जाते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे शाळा, क्लासेसवाल्यांनी होमवर्कची सक्ती करू नये. विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर उभे करू नये.