शरीफ शेख
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जळगाव व औरंगाबाद जिल्हा बैठक नुकतीच पाचोरा जारगाव येथील नाथ मंदिरात पार पडली.
अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे संस्थापक तथा केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने यांच्या अध्यक्षतेत तर प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख ,पदेश उपाध्यक्ष लक्ष्मण आबा सुर्यवंशी, अॅड अभय पाटील विधी सल्लागार ,विभागीय अध्यक्ष गणेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत. जळगाव व औरंगाबाद जिल्ह्यातील पत्रकारांच्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, व जिल्ह्य तालुकास्तरावर नियुक्त्या करून उपस्थित पत्रकारांना संघटनेच्या भविष्यातील वाटचाली व संघटनात्मक बांधणी बाबत संघटनेचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीत जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे संपादक संचालक किरण सोनवणे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. तर शांताराम जाधव उत्तर महाराष्ट्र सचिव ,भानुदास महाजन- उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, एबीएन न्युज चे संपादक मनोज महाले- उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख ,ज्ञानेश्वर आप्पा वाघ- सोयगाव तालुका मराठवाडा विभागीय संघटक व जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी लोहारा येथील दिनेश चौधरी यांच्या नियुक्त्या करून सन्मान करण्यात आला.
या वेळी मंगेश जोशी, जेष्ठ सल्लागार भास्कर सोनवणे, पाचोरा तालुकाध्यक्ष धनराज पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष नितीन सोनार, शहराध्यक्ष मनिष सोनवणे, संजय कोतकर , नगरदेवळा येथील मिलींद दुसाने , प्रकाश जगताप, सोनु परदेशी, गणेश देशमुख, दिपक नेरपगार, ज्ञानेश्वर राजपूत, दिनेश चौधरी, हेमशंकर तिवारी, भडगाव तालुक्यातील सुभाष ठाकरे, सुनील पाटील,सुभाष पवार, जामनेर तालुक्यातील गणेश पांढरे, सोयगाव तालुकाध्यक्ष रविंद्र शिंदे, शहराध्यक्ष सुनिल काळे, गणेश खैरे, संदीप इंगळे, योगेश पाटील, नारायण चौधरी, जितेंद्र पाटील, संजय शहापुरकर, शेख गुलाब पटेल, भाऊराव मोरे, रहीमखान, ईश्वर इंगळे, विकास पाटील, दत्तात्रय काटोले, वसीम पटेल, विजय कोळी, अरुण पाटील, राजु ठाकुर, भिकन पाटील, सुनील लोहार, युवराज चौधरी, भाऊराव मोरे, ज्ञानेश्वर राजपूत, बनोटी ,गोदेगांव,तसेच पाचोरा तालुक्यातील भडगाव , नगरदेवळा, गाळण, जामनेर, पहुर येथील सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अक्षय गरे यांनी मानले.