फुलचंद भगत
वाशिम:-दिनांक 14/08/2023 रोजी अंदाजे 08/15 वा चे सुमारास मानोली रोड वरील सतिष बाबाराव चव्हान यांचे कॉम्प्लेक्स चे टिनाचे वरांड्या मधे एक पुरुष जातीच्या अनोळखी इसमाचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहे अशी माहीती मिळल्याने तात्काळ घटनास्थळी
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती आरज मॅ. पोनि सुधाकर आढे, सपोनी शेंबडे,सपोनी गायकवाड, सपोनी वाघमोडे, पोउपनी राठोड, पोहेका सोनोने, पोहेका सोळंके, पोहेका रन्जु, पोहेका तायडे, पोना सुनील गंडाईत, पोका मोहम्मद परसुवाले पोका अमोल वानखडे
पोका प्रमोद वानखडे चालक पोना झडके, गाडे असे जावुन घटनास्थळाची जावुन प्रेताची
पाहणी करुन आजबाजुला माहीती घेवुन अनोळखी मृत ईसमाची ओळख पटवुन घेतली असता सदरचा मृतक ईसम हा मंगेश उर्फ गोलु विठ्ठल ईंगळे रा वडरपुरा मंगरूळपीर असे असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्ह्यातील मृतक हा दारु पिण्याचे सवईचा असल्याची माहीती
मिळाल्याने तात्काळ वरिष्ठांचे आदेशाने सपोनी निलेश शेंबडे, पोउपनी दिनकर राठोड, पोकाँ
मोहम्मद परसुवाले, पोकॉ अमोल वानखडे असे शोध पथक गठीत करुन रवाना करण्यात आले असता त्यांना मिळालेल्या गुप्त माहीती द्वारे परिसरातील सर्व आजुबाजुच्या हॉटेल, धाबे,बिअर बार या ठिकाणी भेट दिली असता त्या ठिकाणी माहीती मिळाली की, यातील मृतक इसम नामे मंगेश उर्फ गोलु विठ्ठल ईंगळे हा युवराज रमेश राउत रा. नविन सोनखास
मंगरुळपीर याचे सोबत दि. 13/08/2023 चे रात्री शेवटचे दिसुन आल्याची माहीती मिळाली.
वरुन तात्काळ संशयीत युवराज रमेश राउत याचा पोलीस स्टेशनचे परिसरात शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, मयत व त्याचे एका महिलेच्या अनैतीक संबधातुन वाद झाल्याने मृतक यास
सतिष चव्हान यांचे मानोली रोडवरील कॉम्प्लेक्स मधे दि. 13/08/2023 चे रात्रीचे अंदाजे 12/00 वा ते 01/00 वाजताचे दरम्यान मृतक दारु पिवुन झोपलेला असताना तेथीलच सिमेंट
विटाचे दगड डोक्यात घालुन मारुन टाकले. तसेच काचेची शिशी फोडुन त्याच काचाने मृतक याच्या गळ्यावर तिन ते चार वेळा वार केले. अशी संशयीत आरोपी युवराज रमेश राउत याने गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर आरोपी यास सदर गुन्ह्यात अटक करण्याची प्रक्रीया चालु
असुन सदर गुन्ह्यात ईतर कोणी संशयीत आहेत काय याचा तपास करीत आहोत. सदर गुन्ह्यातील मृतक याचा भाऊ नामे महादेव विठ्ठल ईगळे याचे तक्रारी नुसार पोस्टे
मंगरुळपीर येथे भा.द.वि. कलम 302,201 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.तरी सदर गुन्ह्यात माहीती मिळाल्यापासून अवघ्या दोन तासाचे आत मृत इसमाची
ओळख पटवुन संशयीत आरोपी निष्पन्न करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सींग, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री भारत तांगडे सा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती आरज मँ. यांचे मार्गदर्शनाखाली मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सुधाकर आढे सपोनी निलेश शेंबडे, पोउपनी दिनकर
राठोड, पोकॉ. मोहम्मद परसुवाले, पोकॉ अमोल वानखडे यांनी केलेली आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206