Home यवतमाळ यवतमाळ जिल्हातील मुकुटबन रोडवरील रेती तस्कराच्या शेतातच रंगली पोलिसांची स्वातंत्र्यदिनी पार्टी?

यवतमाळ जिल्हातील मुकुटबन रोडवरील रेती तस्कराच्या शेतातच रंगली पोलिसांची स्वातंत्र्यदिनी पार्टी?

156

यवतमाळ जिल्हातील तालुका वणी पोलीस विभाग नेहमी कोणत्या न कोणत्या चर्चेत असल्याचे दिसते स्वातंत्र्य दिनाच्या रात्री वणी मुकूटबन कायर रोडवर असलेल्या एका रेती तस्करांच्या शेतामध्येच पोलीस विभागाची चांगली पार्टी रंगल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे.

सदर या पार्टीमध्ये पोलीस विभागातील काही वरिष्ठ अधिकारी आपल्या शासकीय वाहनासह पार्टीत सहभागी झाल्याची खात्रीदायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या पार्टीची भनक कोणालाही लागू नये यासाठी रस्त्यावर पोलीस बंदोबस्त असल्याचीही माहिती आहे. एका रेती तस्करांच्या शेतातच ही पार्टी रंगल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच ही पार्टी वणीतील रेती तस्कर व वरोरा येथील रेती तस्कराने पोलीस विभागासाठी खास आयोजित केल्याची चर्चा सर्वत्र आहे माञ पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांनी रात्री झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मोबाईल लोकेशन काढले तर सत्य नक्कीच बाहेर येईल असेही ‌जन – सामान्य नागरिकात चांगलीच चर्चा रंगली आहे , आता माञ पोलीस महानिरीक्षक अमरावती व पोलीस अधिक्षक काय कारवाई करतील हे वणी शहरातील नागरिक पाहण्यासाठी अती उत्सुक आहे.