Home यवतमाळ साखरा येथे ईगल ईन्फ्राक्ट्रक्चर कंपनीचे मुरुमाचे दोन ट्रक महसुल विभागाने जप्त केले..!

साखरा येथे ईगल ईन्फ्राक्ट्रक्चर कंपनीचे मुरुमाचे दोन ट्रक महसुल विभागाने जप्त केले..!

88

Aynuddin Solanki

घाटंजी – घाटंजी तालुक्यातील साखरा येथे अवैध मुरुम वाहतूक करणारे ईगल ईन्फ्राक्ट्रक्चर कंपनीच्या मालकीचे दोन ट्रक क्रमांक MH 05 / DK 9198 व MH 05 / DK 9098 या क्रमांकाचे दोन ट्रॅक आठ ब्रास विना परवाना उत्खनन व वाहतूक करत असतांना मुरुमासह तहसीलदार विजय साळवे यांनी ताब्यात घेउन घाटंजी पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी लावण्यात आले आहे. तथापि, विशेष म्हणजे घाटंजी तालुक्यातील अनेक गावात विना राॅयल्टीने रेती, मुरुम उत्खनन करण्यात येत असल्याच्या तक्रारी महसुल विभागाला प्राप्त झाल्या होत्या, हे येथे उल्लेखनीय.

सदरची कारवाई घाटंजी तहसीलचे तहसीलदार विजय साळवे यांनी केले. या वेळी महसूल विभागाचे पथक त्यांच्या सोबत होते. यावेळी शिरोलीचे मंडळ अधिकारी अनील येरकार, जिप चालक अभिजीत तिवारी आदीं सोबत होते. या मुळे अवैध मुरुम उत्खनन करणारयांचे धाबे दणाणले आहे.

दरम्यान, मुरुम व रेती यास दंड करण्याचा अधिकार तहसीलदार विजय साळवे (घाटंजी) यांना असुन ट्रक्टर व ट्रक यास दंड करण्याचा अधिकार पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय महसूल अधिकारी याशनी नागराजन यांना असल्याने आज सुट्टीचा दिवस असल्याने वाहनाला दंड मात्र सोमवारी आकारण्यात येणार आहे, अशी माहिती घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे यांनी दिली.