Home बुलडाणा कृषि सहाय्यकांचा नकार, २३ गावांचे शेतकरी वंचित,

कृषि सहाय्यकांचा नकार, २३ गावांचे शेतकरी वंचित,

112

पिपिंप्री आंधळेच्या महिला सरपंचाने कागदपत्रांचा गठ्ठा ठेवला कृषि अधिकाऱ्याच्या टेबलवर

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा:- मागील वर्षी पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असताना अधिकाऱ्यांचे आदेश असताना ते काम आमचे नाही अशी भूमिका कृषि सहाय्यकांनी घेतल्याने तेवीस गावातील शेतकरी वंचित आहेत, दीड महिन्यापासून त्रस्त झालेल्या पिंप्रीआंधळे येथील महिला सरपंच अंजली आंधळे यांनी गावातील शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा गठ्ठा घेऊन कृषि कार्यालय गाठले आणि तालुका कृषि अधिकारी यांच्या टेबलवर गठ्ठा ठेऊन तातडीने आर्थिक मदत मिळण्यासंदर्भात पाऊले उचलण्याची मागणी सरपंच अंजली आंधळे यांनी केली. सन २०२२ च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेर पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे, यासाठी देऊळगाव राजा तालुक्यातील ६७ गावातील शेतकऱ्यांचे आधारकार्ड, बँकेचे पासबुक आणि मोबाईल क्रमांक संकलित करून ती यादी ऑनलाईन तहसिल कार्यालयात सादर करणेकामी तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक या तीन विभागाच्या कर्मचाऱ्यांची गावनिहाय नियुक्ती तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या संयुक्त सहीनिशी आदेश दि.५ जुलै २०२३ रोजी काढण्यात आले होते. यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील २३ गावांची कामे कृषि सहाय्यक यांना देण्यात आली होती मात्र पंधरवाडा उलटला तरीही कृषि सहाय्यकांनी काम करण्यास नकार दिला, गावातील एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहू नये म्हणून पिंप्री आंधळे गावच्या महिला सरपंच अंजली अर्जुन आंधळे यांनी गावात दवंडी देऊन शेतकऱ्यांची कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयात जमा करून घेतली, दीड महिना उलटला तरी संघटनेच्या नावाखाली कृषि सहाय्यक काम करत नव्हते, यामुळे संतप्त झालेल्या सरपंच अंजली आंधळे शेतकऱ्यांना व कागदपत्रांचा गठ्ठा सोबत घेऊन तालुका कृषि कार्यालयावर धडक मारली, आणि तालुका कृषि अधिकारी कछवे यांच्या टेबलवर गठ्ठा ठेऊन शेतकऱ्यांवर अन्याय कशासाठी असा जाब विचारला. त्यावर नैसर्गिक आपत्तीचे काम हे महसूल विभागाचे आहे यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांनी काम न करण्याचा निर्णय घेतला असे सांगत कृषि सहाय्यकांची पाठराखण केली त्यावर सरपंच अंजली आंधळे यांनी हे जर तुम्हाला माहित होते तर तहसिलदार बीडीओ आणि तालुका कृषि अधिकारी यांच्या संयुक्त सहीने जो आदेश काढला त्यावर तुम्ही सही का केली असा प्रश्र्न उपस्थित केला तेंव्हा तालुका कृषि अधिकारी कछवे निरुत्तर झाले. संतप्त सरपंच व शेतकरी यांनी कागदपत्रांचा गठ्ठा त्यांच्या टेबलवर ठेऊन त्यांना निवेदन सादर केले. बॉक्स.. *माजी मंत्री आ.डॉ.शिंगणेंना केला फोन……… तालुका कृषि अधिकारी यांच्या कक्षातून आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांना फोन करून सरपंच अंजली आंधळे यांनी या प्रकरणी माहिती दिली त्यावर लगेच जिल्हाधिकारी यांना बोलतो, आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत तातडीने मिळण्यासाठी कार्यवाही करायला सांगतो असे आश्वासन सरपंच व शेतकऱ्यांना दिले.* यावेळी सरपंच अंजली आंधळे काशिनाथ काका आंधळे गजानन मामा डोईफोडे, साहेबराव आंधळे मधुकर आंधळे रामेश्र्वर आंधळे, संतोष आंधळे, अर्जुन नागरे बबन सावजी नारायण आघाव, उत्तमराव डोईफोडे, पंढरीनाथ डोईफोडे मनोहर आंधळे संतोष डोईफोडे मल्हारी आंधळे संदीप आंधळे विकास ठाकरे पवन आघाव सतिश आंधळे, गणेश आंधळे दिनकर आंधळे ग्रामपंचायत सदस्य राजु गुमलाडू, डिगांबर परिहार, पत्रकार अर्जुनकुमार आंधळे हजर होते.*

टेबलवर