Home यवतमाळ पाटण पो.स्टे अंतर्गत येत असलेल्या बोरी – मांडवीत खुलेआम मटका जुगार सुरु

पाटण पो.स्टे अंतर्गत येत असलेल्या बोरी – मांडवीत खुलेआम मटका जुगार सुरु

148

पाटणबोरी – प्रतिनिधि 
झरी – जामणीच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या बोरी – मांडवी या छोट्या वस्तीच्या गावाची लोकसंख्या अंदाजे 1350 असुन येथे दहा ते पंधरा दिवसा पासुन या गावात मोठ्या प्रमाणात जुगार मटकापट्टी खुलेआम सुरु आहेत पाटणबोरी सर्कल मधील अवैधधंदे पांढरकवडा ठाणेदार यांनी संपुर्ण पणे बंद केले .

त्यामुळे हे अवैधंदे चालविणारे डाँन आपला मोर्चा पाटणबोरीला लागुनच असलेल्या बोरी -मांडवीकडे वळविला आहे . त्यामुळे हा प्रकार सामाजिक कार्यकर्त खपवुन घेत नसुन ठाणेदार पाटण यांना मोबाईल व्दारा संभाषण करुण बंद करण्याकरीता सांगितले मात्र या मोनु ,गोल्याकडुन मोठी रक्कम मिळत असल्यामुळे ठाणेदार पाटण यांनी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कार्यकर्त करीत आहे या प्रकाराची दखल त्या भागाचे सक्रिय पत्रकार यांनी सुध्दा फोनव्दारे माहिती दिली परंतु ठाणेदार ऐकत नाही पांढरकवडा पोलिस मात्र आपल्या क्षेत्रातील अवैधंदे बंद केले . त्यामुळे हे डाँन लोक लोकांना लुटण्याचा धंदा चालविला आहे . या ठिकाणी तेलंगाणा राज्यातील मटाका जुगार खेळणारे आपल्या चारचाकाच्या वाहणाने येतात त्यांच्या नास्ता व जेवनाची सोय मटाकिंग हे लागुनच असलेल्या पाटणबोरीत एका खोलीत करतात व मटक्याची जंत्री सुध्दा करतात या पाटणबोरी येथिल औट पोष्टचे पोलिसांनी ही कारवाई करावी असे येथिल जनतेतु बोलल्या जात आहे सदर मटकापट्टी जुगारे हे मांडवी येथिल जि. प. शाळे जवळ भरवितात व स्मशनभुमीत हे सर्व चुकारे व मटका पट्टी या ठीकाणी करतात त्यामुळे शाळकरी मुलांनवर विपरीत परिणाम होवु शकते करीता गावातील सुज्ञ लोक ठाणेदार पाटण यांच्याशी संपर्क केला मात्र वाव मिळत नाही करीता संबधित वरिष्ठ पोलिस अधिकारी व एल . सी. बी विभागांनी धाड मारुन हे सुरु असलेले अवैध धंदे बंद करावे अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागले याचा परीणाम ठाणेदार यांच्यावर राहील करीता हे धंदे बंद करावे अशी तार्क मागणी गावातील संज्जन नागरिकांकडुन होवु लागली आहे