Home बुलडाणा महिला पोलीस कर्मचारी आणि दीड वर्षीय मुलीची चाकूने भोसकून हत्या ,

महिला पोलीस कर्मचारी आणि दीड वर्षीय मुलीची चाकूने भोसकून हत्या ,

146

 

पत्नी आणि मुलीला संपवल्यावर पतीने स्वतः केली आत्महत्या

अमीन शाह ,

बुलढाणा

चिखली येथे आज खामगाव रोडवर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ ऐका घरात खुनी थरार घडला असून चिखली पोलीस ठाण्यात महिला पोलिस कर्मचारी वर्षा दंदाले हि कार्यरत होती त्यांना एक दीड वर्षाची चिमुकली पण होती आज काही तरी करणा वरून पती पत्नीत भांडण झाले भांडण विकोपाला गेल्याने पतीने पत्नीची अत्यन्त निर्घृणपणे हत्या केली. कांदा कापायच्या या चाकूने या माणसाने दीड वर्षाच्या मुलीचाही खून केला. दोघांचा जीव घेतल्यानंतर हा व्यक्ती घटनास्थळावरून निघून सरळ काठोडा या गावी गेलं व तेथे त्याने ही विहरित गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या माहिती नुसार ही मृतक महिला पोलीस कर्मचारी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात कार्यरत होती नुकतीच त्याची बदली होऊन ती चिखली येथे राहण्यास आली होती ,

विहरित फाशी घेतलेल्या अवस्थेत पती किशोर ,

 

पत्नी व चिमुकली ची हत्या करून पती किशोर जनार्धन कुटे रा , खैरव याने ही कवठल शिवारात एका विहरित गळफास लावून आत्महत्या केली चिखली तालुक्यात घडलेल्या घटने मुळे खळबळ उडाली असून या घटनेचा तपास चिखली व अंढेरा पोलीस करीत आहे ,

मृतक पती पत्नी ,