Home जळगाव सिव्हिल मध्ये बोगस डॉक्टरला नागरिकांनी दिला प्रसाद….!

सिव्हिल मध्ये बोगस डॉक्टरला नागरिकांनी दिला प्रसाद….!

161

जळगाव जिल्हापेठ पोलीसांच्या दिले ताब्यात…!!

शरीफ शेख

जळगाव , दि. ०४ :- सिव्हिल मध्ये डॉक्टर असल्याचे भासवून एका अल्पवयीन तरूणीला तपासत असतांनाच तिच्या वडीलांच्या लक्षात आल्यानंतर त्या बोगस डॉक्टरला आज दुपारी ३ वाजता नागरीकांनी चांगलाच चोप दिला. या बोगस डॉक्टरला जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील दगडी मनवेल येथील १२ वर्षाची मुलगी हिच्या पोटात दुखत होते त्यामुळे त्यांनी आज सिव्हिल मध्ये दाखल केले होते. आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास बोगस डॉक्टर मुकेश चंद्रशेखर कदम वय २९ रा. मोहाडी ता.जि.जळगाव हा ४ नंबर वार्डात येवून आपण एम.डी. वैद्यकिय अधिकारी असल्याचे सांगून मुलीची टेटेस्कोपने तपासणी करू लागला यावर तरूणीचे वडील यांना शंका आल्याने त्यांनी सिव्हिलच्या आरोग्य सेविकेला विचारले असता डॉक्टर नसल्याचे सांगितले. यावेळी त्याच्या कडे इंजेक्शन देण्याचे ॲम्बुल देखील होते त्यांनी तत्काळ त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता बोगस डॉक्टर मुकेश कदमने पळ काढला. त्यांनी आरडाओरड केली असता काही तरूणांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. सिव्हिल हाँस्पिटलच्या पोलीस चौकीत असलेल्या पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

जळगाव जिल्हा पेठ पोलीसांनी तात्काळ सिव्हिल मध्ये धाव घेवून बोगस डॉक्टर मुकेश कदम याला ताब्यात घेतले. मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरुन कदम विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.