पुणे – 25 ऑगस्ट 2023 रोजी पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे सर यांच्या मार्गदर्शनाने पुणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सिद्धार्थ सरवदे, उपाध्यक्ष बाळासाहेब सुतार, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील चांदणे व कार्याध्यक्ष किशोर ओहळ ,पुणे व सोलापूर जिल्हा पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीमध्ये नूतन पुणे जिल्हा अध्यक्ष राजेखान शौकत पटेल यांची निवड जाहीर करण्यात आली . राजेखान पटेल यांनी पत्रकार म्हणून दैनिक सकाळ, जनलोक वार्ता , मुहमेंट एक्सप्रेस सोशल फायटर , टीव्ही 9 अश्या प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये पत्रकार म्हणून कार्य मोठ्या प्रमाणात केलेले आहे . सध्या अल्फाज टाइम्स साप्ताहिक व अल्फाज युट्युब पोर्टल प्रिंट व डिजिटल मीडियाचे संपादक मालक म्हणून कार्यरत आहेत व मानवाधिकार महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत.
गेल्या पंचवीस वर्षापासून सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल अल्फाज टीम मधील पत्रकार बांधव , पुणे सोलापूर जिल्हा, गुजरात राज्यातील बांधवांनी या निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव करून आनंद व्यक्त केला आहे . पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी दिलेले जबाबदारी पराकष्टाने सर्व पत्रकार बांधवांच्या हितासाठी लोककल्याणासाठी याचा निश्चित उपयोग करण्याचा प्रयत्न करील हा आशावाद मांडला. सर्वांनी यांच्या पुढील कार्यास व वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Post Views: 128