यवतमाळ – आयुष भारत डॉक्टर असो.च्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी डॉ. विवेक चौधरी यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आमीर मुलाणी साहेब यांनी केली. ही नियुक्ती राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. शाहीर मुलाणी, राष्ट्रीय सचिव डॉ.आनंद भोसले,राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विश्वास वाघमारे,राष्ट्रीय नॅचरोपॅथी सचिव डॉ. जलील शेख,राष्ट्रीय कार्याध्यक्षा डॉ.सुतार मॅडम,राष्ट्रीय अल्टरनेटिव्ह मेडिसिन अध्यक्ष डॉ. सुतार सर,राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.मनीषा गुरव,राष्ट्रीय कायदेविषयक अध्यक्ष डॉ. गणेश पाटील,डॉ. फैयाज शेख,डॉ. तन्वीर देशमुख,डॉ. नामदेव मोरे,डॉ. राजेंद्रकुमार नवले,डॉ. स्वाती राजे मॅडम,डॉ. फैझान इनामदार,डॉ. सेंड्रा डिसोझा मॅडम,डॉ. शब्बीर पठाण,डॉ. फिरोझ पठाण,विदर्भ अध्यक्ष डॉ. विनोद देशमुख सर,तसेच राष्ट्रीय विधी सल्लागार कमिटी,राष्ट्रीय पद नियुक्ती समिती,राष्टीय फोर ऍक्शन कमिटी,तसेच सर्व कमिटी च्या सहमतीने नियुक्ती करण्यात आली आहे.संपूर्ण देशात कार्यान्वित असणारी ग्रामीण तसेच शहरातील डॉक्टरांच्या न्याय व हक्कासाठी लढाणारी देशातील सर्वांत मोठी आयुष भारत असोसिएशन /संघटना आहे.आयुष भारत संघटनेचे कार्य आणि उद्दिष्ट असे आहे आयुष भारत फिरते हॉस्पिटल तसेच औषधांवर संशोधन,गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण सेवा पुरवीने,वैद्यकीय क्षेत्रात नौकरी,वैद्यकीय क्षेत्रात कार्यान्वित असणाऱ्या सर्व डॉक्टर साठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी,प्रत्येक जिह्यात वैद्यकीय शिक्षण संस्था उभारणे, गरीब लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवीने,२४ तास मोफत ऍम्ब्युलन्स सेवा,डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्वरित मदत,डॉक्टरांना वैद्यकीय कायदेविषयक सल्ला /मदत देणे तसेच डाक्टरांच्या समस्या, डाक्टरांच्या विविध प्रश्नासाठी कार्य करणारी देशातील सर्वांत मोठी संस्था म्हणून “आयुष भारत असोसिएशन “म्हणून ओळखल्या जाते…