Home यवतमाळ महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय पुरस्कारा साठी...

महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय पुरस्कारा साठी यवतमाळ नगरपालिकेतील शिक्षकांची निवड

81

यवतमाळ – महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने आदर्श शिक्षक ,आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शाळा पुरस्कार राज्याध्यक्ष मा. अर्जुन कोळी यांनी जाहीर केले. सदर राज्य पुरस्कार मा. मुख्यमंत्री , मा. उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री व मा. आयुक्त मा. खासदार ह्यांचे हस्ते पुरस्कार दिनांक – 8 आक्टोंबर 2023 रोजी पनवेल येथे सत्कार करण्यात येणार आहे.

यामध्ये नगरपरिषद यवतमाळ येथील आदर्श शिक्षक पुरस्कार- संजय चुनारकर न.प. शाळा क्र 8 पिंपळगाव यवतमाळ

आदर्श शिक्षक पुरस्कार- रेखा वरखडे न.प. शाळा क्र.6 अंबिकानगर यवतमाळ
आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार – सौ. करुणा बळी खैरे न.प. शाळा क्र.6 अंबिकानगर यवतमाळ तर आदर्श शाळा पुरस्कार- सौ.ज्योती सावळकर मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद डिजीटल ग्रीन पार्क स्कुल न.प. शाळा क्र. 18 गेडामनगर यवतमाळ ह्यांना आज महाराष्ट्रात राज्य नगरपालीका व महानगरपालीका शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य ह्यांचे तर्फे जाहीर करण्यात आला.

पुरस्काराकरिता यवतमाळ नगरपालिकेतील शिक्षकांची निवड झाल्याबद्दल मुख्याधिकारी मा. दादाराव डोल्हारकर साहेब व प्रशासन अधिकारी निता गावंडे मॅडम यांनी अभिनंदन केले आहे

तसेच संघटनेचे विभागीय अध्यक्ष संतोष राठोड, राज्य संपर्कप्रमुख विनोद चव्हाण, विभागीय उपाध्यक्ष डॉ.विनोद डवले, जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, शाखा अध्यक्ष धर्मा पवार, सरचिटणीस राजू कुडमेथे, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे,युसुफ खान, संघटक असरार खान,जिल्हा सदस्य आतिक बेग, सहसचिव शाकिर अस्लम,कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत कांबळे,सहकोषाध्यक्ष निवृत्ती आंबेकर, प्रसिद्धीप्रमुख मनोहर भिसे,अनिल चुटे,विठ्ठल वाणी, रणजीत बांबल यांनी अभिनंदन केले आहे. यवतमाळ नगरपालिकेच्या शिक्षकांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.