➡️ घाटंजी महसूल विभागाची कारवाई..!
( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी, दि. 5 सप्टेंबर :- घाटंजी तालुक्यातील मौजा कोळी येथे अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रक क्रमांक MH 40 / N 6624 व MH 04 / FU 3734 या क्रमांकाचे दोन ट्रॅक आठ ब्रास रेती सह विना परवाना उत्खनन व वाहतूक करत असतांना घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे यांनी ताब्यात घेतले.
तसेच पुढील कारवाई साठी अवैध वाहतूक करणारे दोन्ही रेतीचे ट्रक घाटंजी पोलीस ठाण्यात लावण्यात आले.
सदरची कारवाई करते वेळी घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे, शिरोलीचे मंडळ अधिकारी अनील येरकार, तलाठी पवन बोंडे, तलाठी नवीन खोब्रागडे, वाहन चालक अभिजीत तिवारी आदीं उपस्थित होते.