Home नांदेड सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी वर गुरुजी ने केला अत्याचार ,

सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी वर गुरुजी ने केला अत्याचार ,

121

 

 

अमीन शाह

देशभरात आज शिक्षक दिन साजरा केला जात आहे. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मात्र याच दिवशी शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर बीडच्या आष्टीतील रहिवासी असलेल्या शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदेड पोलिसांनी आरोपी नराधम शिक्षकाला अटक केली आहे.

इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट मध्ये उघड झाली आहे. किनवट येथील एका जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार आहे. या घटनेमुळं पालकांनादेखील मोठा धक्का बसला आहे. जितेंद्र धोंडे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी येथील मूळ रहिवासी असलेला आरोपी शिक्षक जितेंद्र धोंडे हा किनवट मधील माध्यमिक शाळेत शिक्षक आहे. आरोपी शिक्षकाने मुलीला आमिष दाखवून तब्बल तीन दिवस म्हणजेच 22, 23 व 24 ऑगस्ट रोजी आपल्या गोकुंदा येथील घरी नेले. त्यानंतर नराधम शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर अल्पवयीन मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत घरी न सांगण्याबाबत धमकी दिली. या सगळ्या प्रकारामुळे पीडित तरुणी घाबरली होती. यानंतर या तरुणीने शाळेत जाण्यास नकार दिला. यानंतर पीडित तरुणीच्या आईने तिला विश्वासात घेत तिची विचारपूस केली असता पीडित तरुणीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. मुलीसोबत घडलेला प्रसंग ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. अल्पवयीन मुलीसोबत घडलेला धकादायक प्रकार उघड झाल्यानंतर तिच्या पालकांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी किनवट पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शिक्षक जितेंद्र धोंडे याच्याविरुद्ध कलम 376 आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अटक करण्यात आली आहे. शिक्षक दिनाच्या दिवशीच ही घटना उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.